मासिक भविष्य

मेष

मेष

आपल्या राशीत केतू , धनस्थानात गुरु, सप्तमात शनि, राहू, लाभस्थानात बुध, नेपच्यून तर व्ययस्थानात रवि, मंगळ, शुक्र, हर्शल अशी ग्रहस्थीती महिन्याच्या सुरुवातीला आहे. हौसेमौजेखातर खर्च केला जाईल. आपली पत प्रतिष्ठा उंचावेल अशी खरेदी केली जाईल. शेअर्समधून फायदा होईल. आपला स्वभाव थोडा चैनी व विषयी होईल. काही सांपत्तिक लाभ होतील, परंतु करमणुकीच्या साधनात पैशाचा व्ययही तसाच कराल. चंद्र-नेपच्यून युतिमुळे आपला आध्यात्माकडीआल ओढा वाढेल. ९ एप्रिल रोजी बुध मीनराशीत तर १0 एप्रिल रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करीत आहे. तर दिनांक १२ रोजी मंगळ आणि १३ रोजी रवि मेष राशीत प्रवेश करीत आहे. आपली सामाजिक पत उंचावेल. आपल्या मतांचा आदर केला जाईल. आपल्या राशीत असणारा शुक्र वैयक्तीक आनंदाच्या घटना घडविणारा आहे. आर्थिक आवक सतत चांगली राहून उद्योगात गुणात्मक प्रगती करणे शक्य होणार आहे. नोकरीत उच्च पदावर काम कराल. धनस्थानातील गुरु आपली आवक वाढविणारा आहे. जुनी येणी वसूल होतील. वडिलोपार्जित इस्टेटीबाबतचे गुंते सुटण्याची शक्यता आहे. एखादी चांगली गुंतवणूक होईल. महिलांना कलेच्या माध्यमातून अर्थप्राप्ती होईल.

वृषभ

वृषभ

आपल्या राशीतून होणारे गुरुचे भ्रमण धार्मिक ओढा वाढळिणारे राहील. नवीन कार्यारंभ केले जातील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश लाभेल. लाभस्थानातून होणारे रवि, मंगळ, बुध, शुक्राचे भ्रमण आपली भरभराट करणारे राहील. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या सहकार्याने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. लाभातील ग्रहाधिक्यामुळे तरुण, तरुणी, विद्यार्थी यांना चांगल्या संधी मिळतील. महिलांना अचानक धनलाभ होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून आपणांस फायदा होईल. नवीन व्यावसायिक करार होतील. शेअर बाजारात उलाढाल करणार्‍यांना आर्थिक फायदा होईल. वडिलोपार्जित स्थावरासंबंधातील कायदेशीर तिढे सुटतील. कोर्टातील एखादे प्रकरण सामोपचाराने मिटेल. उत्तरार्धात मात्र शुक्र, मंगळ आपल्या राशीच्या व्ययस्थानात प्रवेश करीत आहेत. कोणतेही महत्वाचे निर्णय घेणे तूर्त टाळावे. हौसेमौजेखातर खर्च केला जाईल. महिलांना मौल्यवान वस्तु खरेदी करता येतील. तार्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. विविध उपक्रमातून फायदा होईल. व्ययातील रवि, मंगळामुळे उष्णतेचे त्रास तसेच नेत्रविकार होण्याची शक्यता राहते. षष्ठातील शनि, राहूमुळे जूने आजार डोके वर काढतील. लेखक, साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल.

मिथून

मिथून

आपल्या राशीच्या दशमस्थानातून रवि, मंगळ, शुक्र, होणारे भ्रमण तरुणांना नोकरीत सुसंधी देणारे राहील. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना चांगल्या संधी चालून येतील. उद्योग, व्यापारात कामगारांवर चांगला वचक निर्माण करता येणार आहे. रंग, फर्निचर व्यवहारात असणार्‍यांना चांगला उलाढालीचा काळ आहे. नोकरीत हाताखालील लोकांचे सहकार्य चांगले राहणार आहे. आपल्या फायद्याचे करार होतील. इतरांकडून काम करुन घेण्याचे कसब साधेल. कवि, कलाकार, लेखक, साहित्यिक यांना नांवलौकिक लाभेल. सरकार दरबारी आपल्या कामाची दखल घेतली जाईल. एखादा पुरस्कार मिळेल. आर्थिक आवक सतत चांगली राहून उद्योगात गुणात्मक प्रगती करणे शक्य होणार आहे. ९ एप्रिल रोजी बुध मीनराशीत तर १0 एप्रिल रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करीत आहे. तर दिनांक १२ रोजी मंगळ आणि १३ रोजी रवि मेष राशीत प्रवेश करीत आहे. आपले कोणतेही काम दुसर्‍यावर सोपवू नका. प्रत्येक कामात स्वत: लक्ष घालण्याची गरज आहे, नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता राहते. कुसंगतिपासून दूर राहा. व्ययातील गुरुमुळे आध्यात्मिक ओढा वाढेल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. हातून पुण्यकर्म घडेल. पंचमस्थ रवि, राहूमुळे संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपली पत उंचावेल.

कर्क

कर्क

या महिन्यात आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून रवि, मंगळ, शुक्राचे होणारे भ्रमण आपल्याला फारच चांगले आहे. महिलांना लांबच्या प्रवासाची संधी मिळेल. सरकार दरबारी आपल्या कामाची दखल घेतली जाईल. लेखक, साहित्यिक, कलाकारांना एखादा पुरस्कार मिळेल. आर्थिक आवक सतत चांगली राहून उद्योगात गुणात्मक प्रगती करणे शक्य होणार आहे. नोकरीत उच्च पदावर काम कराल. ९ एप्रिल रोजी बुध मीनराशीत तर १0 एप्रिल रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करीत आहे. तर दिनांक १२ रोजी मंगळ आणि १३ रोजी रवि मेष राशीत प्रवेश करीत आहे. तरुणांना नोकरी, काम, उद्योग मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. व्यवसायातील आत्मविश्‍वास व कामाचा वेग वाढेल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. दशमातील केतूमुळे मात्र नोकरीत कामाचा त्रास जाणविण्याची शक्यता आहे. आपले तत्व सोडून कोणतेही काम करु नका. सुखस्थानातील शनि, राहू घरात कटकटी निर्माण करणारे आहेत. लाभातील गुरु मुळे आपल्या जवळच्या लोकांचे सहकार्य सतत मिळणार आहे. आपल्या कल्पनांना आकार देणारे ग्रहमान आपल्याला लाभले आहे. मित्र परिवार चांगले सहकार्य देईल. इच्छापूर्ती होईल. भविष्यकाळाच्या दृष्टीने मोठय़ाप्रमाणावर गुंतवणूक करता येणे शक्य होईल. सूचक स्वप्ने पडतील.

सिंह

सिंह

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्वामी रवि अष्टमातून भ्रमण करीत आहे. तेथेच मंगळ, शुक्र, बुध, हर्षल आहेत. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. अष्टमस्थ हर्षल वाहनांचे त्रास देणारा व प्रवासात कटकटी करणारा आहे. अपघातजन्य योग संभवतो. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. उष्णतेचे विकार, संसर्गजन्य विकार यांचा त्रास जाणविण्याची शक्यता राहते. कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी त्यातील तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. वडिलोपार्जित इस्टेटीबाबतचे गुंते सुटण्याची शक्यता आहे. अष्टमात होणारी रवि-शुक्र युति अचानक धनलाभ देणारी आहे. एखाद्या व्यवहारात अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. पराक्रमातील शनि बंधुभगिनी संबंधात काही गैरसमज निर्माण करणारा आहे. महिन्याच्या उत्तरार्धात भाग्यस्थानी येणारे ग्रह आपला धार्मिक ओढा वाढविणारे राहतील. लेखक, पत्रकार, प्रकाशक यांना चांगला काळ आहे. राजकीय, समाजिक कार्यात सत्कार, सन्मान होईल. कलाकारांना प्रसिद्धी मिळेल. महिलांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. मौल्यवान वस्तू जपाव्यात. दशमस्थ गुरु तरुणांना चांगल्या संधी देणारा राहील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. नोकरीतील वातावरण मनाजोगे राहील. बढती संभवते अथवा वरीष्ठ जागेवर काम करण्यास मिळेल. कौटुंबिक आनंद वाढणार्‍या घटना घडतील. घरात शुभसमारंभ होईल.

कन्या

कन्या

आपल्या राशीच्या धनस्थानातून शनि, राहूचे भ्रमण होत आहे. उधारी उसनवारी टाळावी. मोठे आर्थिक व्यवहार करताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. वसूली उद्योगात दिरंगाई लागणार आहे. सप्तमातील रवि, मंगळ, शुक्र जोडीदाराचा भाग्योदय करणारे आहेत. मात्र सप्तमातील हर्षलच्या भ्रमणामुळे जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता राहते. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. मात्र प्रत्येक कामात स्वत: लक्ष घालण्याची गरज आहे. धाडसी निर्णय घेतले जातील. ९ तारखेला राशीस्वामी बुध आपल्या राशीच्या सप्तमस्थानात प्रवेश करीत आहे. तर १0 तारखेला शुक्र, १२ तारखेला मंगळ, १३ तारखेला रवि मेष राशीत प्रवेश करीत आहे. अष्टमातील ग्रहाधिक्यामुळे कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. अष्टमातील मंगळामुळे उष्णतेचे विकारांचा त्रास होईल. भाग्यातील गुरु तीर्थस्थळांना भेटी घडविणारा आहे. हातून पुण्यकर्म घडेल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. संततीचे प्रश्न चांगल्या रीतीने सुटतील. विवाह ठरेल. महिला संततीच्या उत्कर्षाने आनंदीत होतील. पुत्रेच्छुंना गोड बातमी मिळेल. नोकरीत हाताखालील लोकांचे सहकार्य चांगले राहणार आहे. इतरांकडून काम करुन घेण्याचे कसब साधेल.

तूळ

तूळ

आपल्या राशीतून शनि, राहूचे भ्रमण होत आहे. साडेसाती आहे. कोणाताही निर्णय घेतना जास्त विचार करणे आवश्यक आहे. आपल्या भागीदारांचे सहकार्य पाहिजे तसे मिळणार नाही. पतिपत्नीत काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. अष्टमातील गुरु पोटाचे विकार देणारा आहे. मधुमेह असणार्‍यांनी जास्त काळजी घ्यावी. षष्ठस्थानातील रवि, मंगळामुळे विरोधकांच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने तोंड द्यावे लागेल. सरकारी ठेकेदारांना चांगले काम हाती येईल. सरकारी परवाने होती येतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. रंग, फर्निचर व्यवहारात असणार्‍यांना चांगला उलाढालीचा काळ आहे. सरकारी नोकरदारांना आर्थिक दिलासा देणार्‍या गोष्टी घडतील. एकूण मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. षष्ठस्थानातील शुक्र बेकारांना मोठय़ांच्या ओळखीने काम, उद्योग मिळवून देणारा आहे. ९ एप्रिल रोजी बुध पंचमस्थानातून षष्ठस्थानात मीन राशीत प्रवेश करीत आहे. तर १0 तारखेला शुक्र, १२ तारखेला मंगळ, १३ तारखेला रवि मेष राशीत म्हणजेच आपल्या राशीच्या सप्तमस्थानात प्रवेश करीत आहेत. जोडीदाराशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा म्हणजे वादंग होणार नाही. भागीदारी व्यवसायात नवीन करार करणे तूर्त टाळावे.

वृश्चिक

वृश्चिक

पंचमस्थानातील रवि, मंगळ, शुक्र आपल्या कार्यक्षेत्रातून प्रसिद्धी देतील. आपल्या कामाची प्रशंसा होईल. नवोदित कलाकारांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. पंचमातील मंगळ खेळाडूंना चांगला आहे. चांगल्या संधी येतील. सप्तमात गुरू असल्याने भागीदारांचे सहकार्य चांगले राहील. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. शुक्र-रवि युतियोग सरकारी पुरस्कार देणारा आहे. मान-सन्मान मिळेल. धाडसी निर्णय घेतले जातील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. अंगभूत कलागुणांना वाव मिळेल. नोकरीत आपल्या चांगल्या कल्पना, योजना राबविण्याजोगे वातावरण निर्माण होईल. उद्योजक महिलांचा सत्कार होईल. ९ एप्रिल रोजी बुध पंचमस्थानातून षष्ठस्थानात मीन राशीत प्रवेश करीत आहे. प्रकाशक, लेखक, साहित्यिक यांना चांगला निर्मितीचा आनंद मिळेल. मोठय़ा लोकांच्या सहकार्याने उद्योग, व्यापारात वाढ करणे शक्य होईल. काहींना ओळखीने नोकरी मिळेल. काहींना आरामदायक वाहन खरेदी करणे जमेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. संततीच्या भविष्याचा चांगला निर्णय लागेल. उच्च शिक्षणाची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांतून चांगले यश लाभेल. नवीन शिकण्याची उमेद वाढेल. उत्तरार्धात नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. विरोधकांच्या कारवायांना सामोरे जावे लागेल.

धनू

धनू

राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपली पत प्रतिष्ठा उंचावेल. पराक्रमस्थानात नेपच्यून असल्याने दिवास्वप्नात वेळ घालवाल. प्रत्यक्ष वस्तुस्थिती व प्रयत्न आपल्याला यशाकडे नेणारे आहेत. जवळच्या प्रवासात अचनाक बदल होतील. सुखस्थानातून रवि, मंगळ, शुक्राचे होणारे भ्रमण आपणांस लाभदायक आहे. वाहन वास्तूचे योग येतील. सरकारी नोकरीत असणार्‍या तरुणांना सरकारी वाहनाचा लाभ होईल. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. मात्र सुखस्थानाचा हर्षल घरात कटकटी निर्माण करणारा आहे. आपल्या मनावर संयम ठेवणे महत्वाचे आहे. जोडधंद्यातून अथवा गृहउद्योगातून कामाचा व्याप वाढविणारे ग्रहमान आहे. आपल्या जवळच्या लोकांचे सहकार्य सतत मिळणार आहे. आप्तस्वकियांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल. उत्तरार्धात आपल्या राशीच्या पंचमात रवि, मंगळ, शुक्र प्रवेश करीत आहेत. केतूवरुन होणारे रवि, मंगळ , शुक्राचे भ्रमण संततीच्या बाबतीत काळजी देणारे राहील. कोणतेही नवीन करार तूर्त टाळावेत. महत्वाच्या निर्णयात योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. स्पर्धापरीक्षांतून यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.

मकर

मकर

महिन्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून रवि-बुधाचे भ्रमण होत आहे. भावंडांशी सुसंवाद साधाल. परदेशस्थ भावंडांचा एखादा सल्ला लाखमोलाचा ठरेल. व्यवसाय-उद्योगासाठी नवीन कर्ज मंजूर होईल. सरकारी परवाने मिळतील. वकील, शिक्षक धर्मोपदेशक यांना समाजात चांगला मान मिळेल. सुखस्थानातील गुरुवरून रविचे होणारे भ्रमण धार्मिक क्षेत्रात प्रगती करणारे राहील. चांगला मार्गदर्शक मिळेल. पंचमातील शुक्रामुळे चांगल्या घटना घडतील. आपण ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहात होता ती समजल्यामुळे आनंदाला पारावर उरणार नाही. घरात मंगलकार्याची नांदी होईल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. महिलांना बदलाची नितांत आवश्यकता वाटेल. त्यामुळे सहलीचे आयोजन कराल. सामाजिक कार्यात असणार्‍या कार्यकर्त्यांना मान-सन्मान प्राप्त होईल. कवि, कलाकार, गायक, वादक यांना सुसंधी लाभतील. नवोदित कलाकारांना चांगले यश लाभेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. तरुणांच्या कर्तृत्वाला झळाळी येईल. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटवाल. विद्यार्थ्यांंना स्पर्धापरिक्षांतून चांगले यश लाभेल. विवाहेच्छुक तरुणांचे विवाह ठरतील. नवपरिणितांना गोड बातमीची चाहूल लागेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. अष्टमातील मंगळ आपल्या वक्तव्यामुळे गैरसमज निर्माण करणारा राहील. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. उष्णतेचे विकार, पित्तविकार यांचा त्रास उद्भविण्याची शक्यता राहते.

कुंभ

कुंभ

राशीतील नेपच्यून, तृतीयातील केतू व चतुर्थस्थानातील गुरु आपला धार्मिक ओढा वाढविणारे राहतील. तीर्थस्थळांना भेटी द्याल. हातून पुण्यकर्म घडेल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. घरात मंगलकार्याची नांदी होईल. धनस्थानातील ग्रहाधिक्य आपली आवक वाढविणारे राहील. उधारी उसनवारी वसूल होईल. गोड बोलून आपले ध्येय साध्य करण्यातच आपले हित आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. प्रयत्नांती परमेश्‍वर या उक्तीचा प्रत्यय येईल.कवि, कलाकारांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. आपल्या कर्तृत्वाला झळाळी येणारी घटना घडेल. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक, शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीतून आनंद मिळवाल. लेखकांच्या हातून झालेल्या टिकात्मक लिखाणामुळे वादंग उद्भवण्याची शक्यता राहते. ९ एप्रिल रोजी बुध धनस्थानात मीन राशीत प्रवेश करीत आहे. तर १0 तारखेला शुक्र, १२ तारखेला मंगळ, १३ तारखेला रवि मेष राशीत म्हणजेच आपल्या राशीच्या पराक्रमस्थानात प्रवेश करीत आहेत. अवाजवी साहस टाळावे. धनस्थानी होणारे रवि-शुक्र, बुध-शुक्र आणि रवि-बुध युतियोग चांगला आर्थिक फायदा करुन देणारे आहेत.

मीन

मीन

राशीतील रवि, मंगळामुळे आपल्या व्यक्तीमत्वाचा चांगला ठसा उमटवाल. तरुणांच्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. राशीतील रवि, शुक्र आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव देतील. नवोदित कलाकारांना पुढे येण्यास चांगल्या संधी मिळतील. उंची वस्त्रालंकारांची खरेदी कराल. राशीतील हर्षल व अष्टमातील वक्री शनि व राहू काही अनपेक्षित घटना घडविणारे राहतील. आपल्या बोलण्याने गैरसमज निर्माण होण्याची शक्यता राहते तेव्हा बोलताना अतिशय विचारपूर्वक वक्यव्य करावे. महिलांनी कागदपत्र तपासून पाहूनच सही करावी. सरकारी कामात विलंब लागणार आहे. स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी. हाडांची दुखणी असणार्‍यांनी विशेष दक्षता घ्यावी. जुने आजार डोके वर काढतील. पराक्रमस्थानी असणारा गुरु भावा-बहिणीसबंधात चांगल्या घडविणारा आहे. कोणाचा लांबलेला विवाह होईल. प्रवास सुखाचे होतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील आपला दबदबा वाढणार आहे. राशीतील रवि, मंगळ, बुध, शुक्र बेकारांना मोठय़ांच्या ओळखीने काम, उद्योग मिळवून देणारा आहे. महिलांना लांबच्या प्रवासाची संधी मिळेल. उत्तरार्धात धनस्थानातील केतूवरुन रवि, मंगळ, शुक्राचे भ्रमण होणार आहे. तेव्हा मोठय़ाप्रमाणावर आर्थिक उलाढाली करताना विचारपूर्वक कराव्यात. उधारी-उसनवारी टाळावी. विद्यार्थी वर्गाला स्पर्धात्मक परीक्षेत चांगले यश मिळेल.