 | मेषआपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. धनस्थानातील गुरु, शुक्र, बुध आपली आवक वाढवि.ण्यास पूरक राहतील. जूनी येणी वसूल होतील. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. आपल्या गोड बोलण्याने अनेक रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. राशीतील रवि, मंगळ आपल्या व्यक्तीमत्वाचा चांगला ठसा उमटवतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. व्यावसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कर्ष साधता येईल. संशोधनपर अभ्यासक्रमातून चांगले यश संभवते. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. शुभदिनांक १२, १३.
|
 | वृषभआपल्याच राशीतील गुरु, शुक्रावरुन चंद्राचे भ्रमण होत आहे. अचनाक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील. आप्तस्वकियांच्या गाठीभेटी होतील. उंची वस्त्रालंकारांची खरेदी होईल. कलाकारांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल.वकर्तृत्वाच्या बळावर मोठी मजल माराल. जोड धंद्यातून चांगला फायदा होईल. मन:स्वास्थ लाभेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. परदेशी संस्थांशी व्यावसायिक करार केले जातील. उत्तरार्धात घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. शुभदिनांक १७, १८.
|
 | मिथूनआठड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. हातून पुण्यकर्म घडेल. आपली सामाजिक पत उंचावेल अशी खरेदी केली जाईल. स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या हौसेमौजे खातर चार पैसे खर्च कराल. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील.मित्र परिवाराची भेट होईल. दैनंदिन जीवनात बदल करण्यासाठी आपण उत्सुक असाल. नावीण्यपू.र्ण कलाकृती मन मोहून घेतील. व्यवसाय उद्योगातून चांगली धनप्राप्ती होईल. भावंडांशी सुसंवाद साधाल. आपले अंदाज अचूक ठरतील. नवीन जबाबदार्या स्वीकाराव्या लागतील. शुभदिनांक १३, १४.
|
 | कर्कआपल्या राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण आपली आर्थिक बाजू बळकट करणारे राहील. लाभस्थानातून रवि, बुध, गुरु, शुक्राचे भ्रमणामुळे गुंतवणूकीतून लाभ होतील. मित्रपरिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. आपल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होण्याच्यादृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. आत्मोन्नतीचा मार्ग सापडेल. सत्संग लाभेल. नवीन रचनात्मक कलाकृतींचा ध्यास घ्याल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. परदेशी संस्थांशी व्यावसायिक करार केले जातील. उत्तराधर्आत जूनी येणी वसूल होतील. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. शुभदिनांक १६, १७.
|
 | सिंहआठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या दशमस्थानातून गुरु, शुक्रावरुन चंद्राचे भ्रमण होत आहे. कवी, कलाकारांना सुसंधी लाभतील. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. दशमातील शुक्र आपल्या अंगभूत कलागुणांना वाव देईल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपले ध्येय गाठल्यामुळे मनस्वी आनंद मिळेल. नवीन लेखन, साहित्यिक कल्पना आकार घेतील. नवीन नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांना सुसंधी लाभतील. नोकरीत पदोन्नती होईल. व्यवसायात अभिनव तंत्र वापरल्यामुळे यश येईल. जीवाभावाच्या व्यक्तीने दिलेला सल्ला लाख मोलाचा ठरेल. अचानक जुना मित्रपरिवार भेटेल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. शुभदिनांक १८.
|
 | कन्याआपल्या राशीच्या भाग्यस्थानातून गुरु, शुक्रावरुन होणारे चंद्राचे भ्रमणामुळे धार्मिकस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. हातून पुण्यकर्म घडेल. लेखकांच्या हातून झालेल्या दर्जेदार लिखाणास पुरस्कार प्राप्त होईल. दैनंदिन जीवनात बदल करण्यासाठी आपण उत्सुक असाल. नावीण्यपू.र्ण कलाकृती मन मोहून घेतील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सुसंधी लाभतील. महत्वाचे निर्णय घेतले जातील. कामाच्या पद्घतीत केलेला थोडासा बदल करावा सुखावह वाटेल. ज्या बातमीची अगदी अतुरतेने वाट पाहात होतात ती समजल्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण येईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल. शुभदिनांक १२.
|
 | तूळआठवड्याच्या सुरुवातीला आपल्या अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातून प्रगती साधता येईल. मौन धारण करुन कार्यसिद्धी साधणे उत्तम. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे.व्यवसाय उद्योगासाठीची कर्ज प्रकरणे मंजूर होतील. आपले तत्व सोडून कोणतेही काम करु नका. धार्मिक विषयाचे लिखाण होण्याची शक्यता आहे. नवीन उपक्रमांचा अवलंब करणे सध्या टाळावे. जिद्दी स्वभावामुळे यश दूर असल्याचे जाणवणार नाही. आपण आपल्या कामाचा दर्जा अधिक उंचाविण्यास प्रयत्नशील राहाल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. प्रवासात आपले खिसापाकीट सांभाळा. हितशत्रूंच्या कारवायांना सामोरे जावे लागेल. शुभदिनांक १८.
|
 | वृश्चिकआपल्या राशीच्या सप्तमस्थानातून गुरु, शुक्रावरुन चंद्राचे होणारे भ्रमणामुळे विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. नवोदित कलाकारांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. जनसंपर्कातून लाभ होतील. भागीदारी व्यवसायातून नवीन करार केले जातील. नवनवीन कल्पना आकार घेतील. प्रतिष्ठीत व्यकिं्तच्या ओळखीतून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. वैयक्तीक उत्कर्षाच्यादृष्टीने आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. आप्तस्वकीयांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनलाभ होतील. आर्थिक आघाडी मजबूत झाल्याने सगळे प्रश्न आपोआपच सुटतील. नवे उपक्रम राबवाल. उत्तरार्धात धार्मिक शुभसमारंभात सहभागी व्हाल. शुभदिनांक १६, १७.
|
 | धनूराजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ह्या आठवड्यातील ग्रहमान अतिशय पूरक राहील. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. विरोधकांना आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या संघटनेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आपणावर येईल. नशिबाची चांगली साथ लाभेल. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतील. कोणतेही काम सहज शक्य नसल्याचे लक्षात येईल. उत्साहाच्या भरात अती दगदग टाळावी. आपल्या प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. शुभदिनांक १३, १४.
|
 | मकरआपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राह्त्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील.महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील.महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेल. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. नवनवीन कल्पना आकार घेतील. व्यवसाय उद्योगात नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्या घटना घडतील. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. नेत्रविकार, उष्णतेचे विकार यांच्यापासून त्रास होण्याची शक्यता आहे. .विरोधकांच्या कारवायांवर मात कराल. शुभदिनांक २२.
|
 | कुंभसुखस्थानातील ग्रहाधिक्यामुळे मनस्वी आनंद होणार्या घटना घडतील. घरातील वातावरण आतिशय प्रसन्न राहील. घरातील सुखसुविधा वाढविण्याकडे विशेष लक्ष द्याल. नवीन खरेदीचे बेत आखले जातील. आप्तस्वकियांच्या गाठीभेटीतून आनंद मिळवाल. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल. जून्या मित्रांचे सहकार्य लाभेल. आपली सामाजिक प्रतिमा उजळणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांत चांगले यश लाभेल. बेकारांना सुवर्णसंधी चालून येतील. हाताखालच्या लोकांचे चांगले सहकार्य लाभेल. शरीराला व मनाला विश्रांतीची गरज भासेल. विरोधकांवर विजय मिळवाल.अतिविचार घातक ठरेल. शुभदिनांक १८.
|
 | मीनआठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तेथील ग्रहाधिक्यामुळे आपण हाती घेतलेल्या कामांत आपणांस यश लाभेल. थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. आपल्या मतांचा आग्रह धरु नका, नाहीतर वादंग होण्याची शक्यता राहते. भावंडांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक, शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातून प्रगती साधता येईल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. हातून पुण्यकर्म घडेल. शुभदिनांक १६, १७.
|