शोधा

व्यापार

दूध महागले..

शासकीय दूध योजनेमार्फत विक्री करण्यात येणार्‍या दुधाचे दर वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्यानुसार म्हशीचे दूध लिटरमागे ३ रुपयांनी तर गायीचे दूध लिटरमागे २ रुपयांनी महागले आहे.

सोने होणार आणखी स्वस्त !

जागतिक बाजारात सोन्याच्या भावात आणखी घसरण झाल्याने केंद्र सरकारने सोन्याच्या शुल्कात आणखी घ…

वित्तीय नियमनाचा सर्वंकष कायदा

फसव्या गुंतवणूक योजनांमुळे सर्वसामान्य जनतेला जबर नुकसान होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्‍वभू…

पेट्रोल दरात अचानक वाढ

केंद्राकडून मिळणारे आयात शुल्क तफावतीचा निधी न मिळाल्यामुळे राज्यातील पेट्रोल कंपन्यांनी बुधवार मध्यरात्रीपासून …

ताज्या बातम्या

  • सर्वसामान्य ग्राहकांची गुंतवणूक करताना फसवणूक होऊ नये, याकरिता सेबीला अधिक सशक्त करण्याची ग्वाही पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी येथे दिली. भांडवली बाजाराची नियंत्रक संस्था असलेल्या सेबीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.
    नुकत्याच उघडकीस आलेल्या सारदा गुंतणवूक योजनेच्या पार्श्‍वभूमीवर सेबीचे अध्यक्ष यु.के. सिन्हा यांनी सेबीच्या सक्षमीकरणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांत वारंवार अधोरेखित केला होता.

  • घसरणीला दिला तेजीने खो लोकमत - १९ तास पूर्वी
    घसरणीला दिला तेजीने खो

    गेल्या चार दिवसांपासूनच्या घसरणीला ब्रेक लावत भारतीय शेअर बाजारात आज तेजी परतली. टाटा स्टील आणि टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तू आणि धातू कंपन्यांच्या नेतृत्वाखालील बडे शेअर्स फायद्यात राहिल्याने बाजारात तेजी परतली.

  • सेन्सेक्स ३९0 अंकांनी गडगडला लोकमत - शुक्र, २४ मे २०१३
    सेन्सेक्स ३९0 अंकांनी गडगडला

    जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारात आजही घसरण झाली. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेने आर्थिक प्रोत्साहनाचा रतीब करण्याचे संकेत दिल्याने जागतिक बाजाराची चाल मंदावली.

  • दूध महागले.. लोकमत - गुरु, २३ मे २०१३
    दूध महागले..

    शासकीय दूध योजनेमार्फत विक्री करण्यात येणार्‍या दुधाचे दर वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्यानुसार म्हशीचे दूध लिटरमागे ३ रुपयांनी तर गायीचे दूध लिटरमागे २ रुपयांनी महागले आहे.

  • पेट्रोल दरात अचानक वाढ लोकमत - गुरु, २३ मे २०१३
    पेट्रोल दरात अचानक वाढ

    केंद्राकडून मिळणारे आयात शुल्क तफावतीचा निधी न मिळाल्यामुळे राज्यातील पेट्रोल कंपन्यांनी बुधवार मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात वाढ केली.

  • वित्तीय नियमनाचा सर्वंकष कायदा लोकमत - गुरु, २३ मे २०१३
    वित्तीय नियमनाचा सर्वंकष कायदा

    फसव्या गुंतवणूक योजनांमुळे सर्वसामान्य जनतेला जबर नुकसान होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्‍वभूमीवर वित्तीय क्षेत्राच्या नियमनातील तफावत दूर करण्याची गरज असून, संपूर्ण वित्तीय क्षेत्रासाठी एक नवीन कायदा करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जात आहेत, असे वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले.

  • तिसर्‍या दिवशीही घसरणीचा मुक्काम

    भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसर्‍या दिवशीही घसरणीने मुक्काम ठोकला. लार्सन अँड टुब्रोचा वित्तीय परिणाम अपेक्षानुरूप न राहिल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४९.३७ अंकांनी गडगडत दिवसअखेर २0,0६२.२४ वर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही १९.६0 अंकांनी घसरत ६,0९४.५0 वर आला.

  • भारतातील प्राप्तिकर विषयक धोरण, त्यातील कलमे समजून घेण्यासाठी भारत सरकारने विशेष मार्गदर्शन शिबिरे घ्यावीत व व्यापक मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा ८६ टक्के जागतिक कंपन्यांनी वर्तविली आहे. ग्रँट थार्नटन इंटरनॅशनल बिझनेस या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही सूचना केली आहे.

  • ‘एचएसबीसी’ला दंड लोकमत - गुरु, २३ मे २०१३

    ग्राहकाने कर्जाची संपूर्ण फेड केल्यानंतरही त्याचे खाते सुरू ठेवत त्याच्याकडून व्याज आकारणी करण्याचा प्रयत्न करणार्‍या एचएसबीसी बँकेला या प्रकरणी गैरव्यवहाराचा ठपका ठेवत नवी दिल्ली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ५.५ लाख रुपयांचा दंड सुनावला आहे.

  • सोने होणार आणखी स्वस्त ! लोकमत - गुरु, २३ मे २०१३
    सोने होणार आणखी स्वस्त !

    जागतिक बाजारात सोन्याच्या भावात आणखी घसरण झाल्याने केंद्र सरकारने सोन्याच्या शुल्कात आणखी घट केली आहे. त्यामुळे सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

  • कराच्या सर्वोच्च श्रेणीत येणार्‍या मात्र अद्यापही कर भरणा न केलेल्या सुमारे ७0 हजार नागरिकांना प्राप्तिकर विभागातर्फे नोटिसा पाठविण्यात येणार आहेत.

  • कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) गेल्या वर्षी २0 जून रोजी ठोठावलेल्या एकूण ६,३0७.३२ कोटी रुपयांच्या दंडापैकी १0 टक्के म्हणजे सुमारे ६३0 कोटी रुपयांचा दंड देशातील १0 आघाडीच्या सिमेंट उत्पादक कंपनयंनी तसेच ‘सिमेंट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ या त्यांच्या व्यावसायिक संघटनेने महिनाभरात भरावा, असा आदेश कॉम्पिटिशन अँपेलेट ट्रॅब्युनलने दिला आहे.

  • ऑगस्टपर्यंत कोटींची शेअर विक्री

    ज्यांच्या शेअर्सची शेअर बाजारात उलाढाल होते अशा खासगी ‘लिस्टेड कंपन्यां’नी त्यांच्या एकूण भाग भांडवलापैकी किमान २५ टक्के भाग भांडवल सार्वजनिकरीत्या विकायला हवे या ‘सेबी’ने लागू केलेल्या नव्या निकषाची पूर्तता करण्यासाठी ४८ खासगी कंपन्या येत्या पाच आठवड्यांत त्यांचे सुमारे ९,९00 कोटी रुपयांचे शेअर विक्रीस काढण्याची शक्यता आहे.

  • राज्यात चीन करणार गुंतवणूक! लोकमत - बुध, २२ मे २०१३
    राज्यात चीन करणार गुंतवणूक!

    मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या मागास भागात चिनी कंपन्यांना असलेल्या गुंतवणुकीच्या संधींबाबत कल्पना दिल्यानंतर चीनचे पंतप्रधान ली केक्विंग अनुकूल प्रतिसाद दिला. त्यांनी गुंतवणुकीसाठी दाखविलेल्या उत्सुकतेने महाराष्ट्राच्या विकासावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे.

आणखी ताज्या बातम्या »