कोल्हापूर

ताज्या बातम्या

  • सातारा : येथील एकवीसवर्षीय प्रियांका मंगेश माहितेने बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास एव्हरेस्ट शिगरावर यशस्वी चढाई करून अनोखा विक्रम प्रस्थापित केला. प्रियांका ही या शिखरावर चढाई करणारी सर्वात लहान मराठी युवती ठरली असून, देशातील तिसरी सर्वात लहान युवती ठरली आहे.

  • कोल्हापूर : म्हैस दूध खरेदी दरात अडीच रुपये, तर गाय दूध खरेदी दरात दीड रुपया वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. यामुळे पशुखाद्य व वैरणीच्या दरवाढीने हैराण झालेल्या दूध उत्पादकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. नवीन दरवाढीची अंमलबजावणी उद्या (दि. 23) पासून करण्याचे आदेश जरी शासनाने दिले असले तरी जिलतील दूध संघ शुक्रवार (दि. 24) पासून अंमलबजावणी करणार आहेत. खरेदीबरोबर विक्री दरातही वाढ होणार आहे. कोल्हापुरातील ग्राहकांना म्हशीचे दूध 4क्, तर मुंबईतील ग्राहकांना …

  • कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील बायोकेमिस्ट्री (जैव रसायनशास्त्र) विभागातील संशोधक-प्राध्यापकाने (व्याख्याता) त्याच विभागातील विद्यार्थिनीस त्रस दिल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे दाखल झाली आहे. तिची दखल घेऊन विद्यापीठाने संबंधित प्राध्यापकास काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित विद्यार्थिनीची तक्रार लैंगिक छळ प्रतिबंधक समितीकडे वर्ग केली आहे.

  • कोल्हापूर : अद्ययावत संशोधन उपकरणांची खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीने ‘सोफिस्टिकेटेड अॅनॅलिटिकल इन्स्ट्रमेंट फॅसिलिटी अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या बायोकेमिस्ट्री (जैवरसायनशास्त्र) विभागाला पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशा स्वरुपातील निधी महाराष्ट्रातून केवळ शिवाजी विद्यापीठालाच मिळाला आहे.

  • कोल्हापूर : ‘जेव्हा केव्हा टोल वसुलीचा प्रयत्न होईल, तेव्हा तो हाणून पाडला जाईल. मग पोलीस येऊ देत, नाही तर एसआरपी येऊ दे. कदापीही मागे हटायचे नाही’, असा जणू संकल्पच आज कोल्हापूरकरांनी सोडला.

  • कोल्हापूर : आरटीओ कार्यालयातील काम आटोपून दुचाकीवरून घरी जात असताना तोरस्कर चौकात ट्रकला ओलांडताना समोरून आलेल्या दुचाकीस्वाराचा धक्का लागून ट्रकला धडकल्याने तरुणाचा मृत्यू झाला. विनायक आनंदा चौगले (वय 21, रा. रजपूतवाडी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. या अपघातामुळे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास खोळंबली होती. यामध्ये दुसरा दुचाकीस्वार सचिन चौगले (रा. माळवाडी, ता. पन्हाळा) हा जखमी झाला.

  • कोल्हापूर : शासकीय कामकाज बंद पाडल्याशिवाय ‘टोल रद्द’ची घोषणा होणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे आता सर्व शक्तीनिशी घेराव घालून जिल्हाधिकारी कार्यालयाची नाकेबंदी करण्याचा निर्णय आज सायंकाळी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे घेण्यात आला. नाकेबंदी कधीपासून करायची, याची तारीख दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.

  • कोल्हापूर, दि. 19 : भाजी मार्केटमधील एका हमालाचा मृत्यू झाल्याने आज भाजी मार्केट बंद ठेवण्यात आले. एक दिवस मार्केटमध्ये बंद राहिल्याने सुमारे चार कोटींची उलाढाल ठप्प झाली. ऐन लगAसराईत अचानक भाजी मार्केट बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय झालीच, शिवाय त्याबरोबर शेतक:यांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

  • कोल्हापूर, दि. 19 (प्रतिनिधी) : एलबीटी (स्थानिक संस्था कर)चा घोळ मिटल्यानंतरच गोव्याचा प्रवेश कराबाबतचा निर्णय धसास लागण्याची शक्यता लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. गेले आठ दिवस मालवाहतूकदारांनी गोव्याला मालाचा पुरवठा थांबविला आहे. ‘एलबीटी’च्या विरोधात व्यापा:यांच्या बंदमुळे इतर मालवाहतूक बंदच आहे. मात्र, उपलब्ध असूनही गोव्याचा आज आठव्या दिवसीही भाजीपाला मालवाहतूकदारांनी रोखून ठेवला. आज खासगी बसेसनी गोव्याची प्रवासी नोंदणी बंद …

  • कोल्हापूर, दि. 19 (क्रीडा प्रतिनिधी) : कबड्डीतील अत्याधुनिक प्रशिक्षण घेण्यासह प्रदर्शनीय सामने खेळण्यासाठी थायलंडमधील मुले व मुली बुधवार (दि. 22)पासून दहा दिवसांच्या कोल्हापूरच्या अभ्यासदौ:यावर येणार आहेत. या कालावधीत हे कबड्डीपटू शिवाजी विद्यापीठाच्या मेघनाथ नागेशकर हॉलमध्ये मॅटवर प्रदर्शनीय सामने खेळणार आहेत, अशी माहिती राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. संभाजी पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.

  • अजब प्रेमाची.. गजब कहानी.! लोकमत - सोम, २० मे २०१३

    संतोष पाटील, दि. 19 (प्रतिनिधी) : वेळ शुक्रवारी सायंकाळी आठची..ठिकाण मंगळवार पेठेतील रामगल्ली..महाविद्यालयीन युवतीचा जीव वाचविण्याची रिक्षावाल्याची धडपड..घराच्या खिडकीत डोकावणारी तीनशे डोकी..आतून ‘राहुल तुम कहा हो’..हृदय पिळवटणारी तिची हाक..तासाभरानंतर शोधत आलेल्या पित्याने सांगितलेला किस्सा..यानंतर उपस्थितांच्या ओलावलेल्या कडा..स्तब्ध करून विचार करायला लावणारी अशी ही ‘अजब प्रेमाची गजब कहानी’..

  • कोल्हापूर, दि.19 (प्रतिनिधी) : लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये भ्रष्टाचारमुक्त जनमत तयार व्हावे व निष्कलंक चारित्र्यसंपन्न उमेदवार निवडून यावा, यासाठी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची कोल्हापुरात बुधवारी (दि. 22) तोफ धडाडणार आहे. केजरीवाल यांच्यासमवेत डॉ. अंजली दमानिया, मयंक गांधी, प्रिती शर्मा-मेनन, संजीव स्वामी, आदी प्रदेशस्तरावरील नेते येणार आहेत.

  • कोल्हापूर, दि़ 19 (प्रतिनिधी) : कोणाकडून तरी ऐकले जाते किंवा बोटावर मोजण्या इतक्या ठिकाणीच जुळ्यांचे दर्शन घेतले जात असले तरी तब्बल 17क् जुळ्यांना आणि सात तिळ्यांना एकत्र बघण्याचा योग जुळ्या व तिळ्यांना जन्म देणा:या पालकांसह त्यांच्या मुलांना मिळाला. निमित्त होतं पत्की हॉस्पिटल आणि रिसर्च फौंडेशनतर्फे आज (रविवार) आयोजित स्नेहमेळाव्याचे.

  • कोल्हापूर : कावळा नाका परिसरातील मोटार मालक संघटनेच्या मालकीच्या जुन्या इमारतीची भिंत पाडत असताना अचानक भिंत अंगावर पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरत सखाराम कांबळे (वय 42, रा. आंबेडकरनगर, कसबा बावडा) असे त्यांचे नाव आहे.

आणखी ताज्या बातम्या »