- विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटल्याने म.रे विस्कळीत लोकमत - ९ तास पूर्वी
विठ्ठलवाडी स्टेशनजवळ गाडीचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला असून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
- त्याने पाहिली प्रेयसीची आत्महत्या! लोकमत - १७ तास पूर्वी
कॉम्प्युटर वेबकॅमद्वारे प्रियकरासोबत हितगुज करताना अचानक उद्भवलेल्या वादातून प्रेयसीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी विलेपार्ले येथे घडली. ही संपूर्ण घटना हतबल प्रियकराने डोळ्यांनी पाहिली.
- रिक्षाभाड्याच्या वादातून प्रवाशाची हत्या लोकमत - १७ तास पूर्वी
रिक्षाभाडे देण्यावरून झालेल्या वादात रिक्षाचालकाने प्रवाशाची हत्या केल्याची घटना येथून जवळच असलेल्या जांभूळपाडा येथे २२ मे रोजी मध्यरात्री घडली. या हत्येनंतर रिक्षाचालक आणि त्याचे सहकारी फरार झाले आहेत.
- आठ अधिकार्यांवर पालिकेची कारवाई लोकमत - १७ तास पूर्वी
जकातीद्वारे मिळणार्या महसुलात अधिक वाढ करण्यासाठी जकात चोरांविरुद्ध मोहीम उघडली असतानाच जकात चोरीप्रकरणी महापालिकेच्या आठ अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
- मुंबई विद्यापीठ देणार अभिनयाचे धडे लोकमत - १७ तास पूर्वी
- सेनेने पालिकेला दिला पाच लाखांचा धनादेश लोकमत - १७ तास पूर्वी
- पत्नीला थकीत देखभाल खर्च द्या; अन्यथा कारवाई लोकमत - १७ तास पूर्वी
- कल्याणमध्ये बेटिंग : तिघा बुकींना अटक लोकमत - १७ तास पूर्वी
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग गाजत असतानाच कल्याणमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केला असून बुधवारी पार पडलेल्या राजस्थान रॉलय विरुद्ध सनराईज हैद्राबाद या मॅचवर बेटिंग लावणार्या 3 बुकिंना अटक करण्यात आली आहे. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
- चोरट्यांचा विळखा लोकमत - १८ तास पूर्वी
नवी मुंबईप्रमाणे पनवेल परिसरालाही सोनसाखळी चोरट्यांचा विळखा पडला आहे. जानेवारी २0११ ते मार्च २0१३ पर्यंत या परिसरात तब्बल २२८ महिलांचे दागिने चोरीला गेले आहेत. यामधील फक्त १0६ गुन्ह्यांचा तपास लागला असून १२२ गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
- नागोठणे स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीची मोहीम लोकमत - १८ तास पूर्वी
शहरातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असतानाच २१ मे रोजी सरपंच प्रणय डोके, उपसरपंच शैलेंद्र देशपांडे यांनी ग्रा.पं.चा कार्यभार हाती घेतल्यानंतर शहराच्या स्वच्छतेबाबत धाडसी पाऊल उचलले आहे.
- विहिघरमधील खुनाचा उलगडा लोकमत - १८ तास पूर्वी
तालुक्यातील विहिघर गावात ८ मे रोजी झालेल्या रतन फडके यांच्या खुनाच्या उलगडा करण्यात पनवेल गुन्हे शाखेला यश आले असून या खुनातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादीने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे गुंतागुंतीच्या झालेल्या या खून प्रकरणातील चक्रावून टाकणारे सत्य अखेर समोर आले आहे.
- कर्मचार्यांचा असहकार सुरूच लोकमत - १९ तास पूर्वी
दुसर्या दिवशीदेखील कर्मचार्यांचा असहकार कायम राहिल्याने मीरारोडला धावणार्या टीएमटीच्या खाजगी ठेकेदाराच्या बसेस धावल्याच नाहीत. ठेकेदार आणि कर्मचारी यांच्यातील वाद आणखीनच उफाळल्याने त्याचा फटका मात्र या मार्गावरील प्रवाशांना बसतो आहे. उद्यापर्यंत हा असहकार सुरूच राहणार आहे.
- लग्नाच्या आमिषाने अत्याचार, फसवणूक लोकमत - १९ तास पूर्वी
लग्नाचे आमिष दाखवत एका १६ वर्षीय मुलीला झोपडीत नेऊन पाच दिवस अत्याचार करणार्या कळव्याच्या मफतलाल झोपडपट्टीतील प्रदीप जयस्वाल (१८) याच्याविरोधात बुधवारी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
- पत्नीची हत्या करणार्या पतीस जन्मठेप लोकमत - १९ तास पूर्वी
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर नऊ वार करून तिची हत्या करणार्या पतीला ठाणे न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ५ मार्च २00९ रोजी आरोपीने राहत्या घरात पत्नीची हत्या केली होती. त्यानंतर, तो स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला.
मुंबई
ताज्या बातम्या
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4



