- भिंत कोसळल्याने १४ वर्षीय मुलगी ठारशनिचौकातील घटना : … लोकमत - ३ तास पूर्वी
नाशिक : शनिचौकातील सीताभवन लगत सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेली जुन्या वाड्याची भिंत कोसळल्याने डोक्यास दगड लागून माधुरी नागू तांबे ही चौदा वर्षाची मुलगी ठार झाली तर तिचा भाऊ जखमी झाला आहे. सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. याबाबत पंचवटी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- भारतीय स्त्री कुटुंबव्यवस्थेचा आधार : अँड. तीर्थंकर लोकमत - ३ तास पूर्वी
मालेगाव : भारतीय स्त्री ही कुटुंबव्यवस्थेचा आधार आहे. त्यामुळे करिअरसोबत चूल, मूल व सासरची - माहेरची माणसे सांभाळण्याची जबाबदारी आधुनिक स्त्रीने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन अँड. अपर्णा रामतीर्थंकर यांनी येथे सोयगाव भागात ‘नाती जपूया’ या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी केले.
- कडून जिल्हाधिकार्यांना पाचारण लोकमत - ३ तास पूर्वी
मंत्र्यां नाशिक : साधू म्हणजे कोण, अशी पृच्छा करणार्या जिल्हाधिकारी विलास पाटील यांना त्यांचे विधान अंगलट येण्याची चिन्हे
आहेत.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना उद्या विभागीय आयुक्तांसहीत पाचारण केले आहे. महंत सुधीरदास महाराज यांनी ही माहिती दिली.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून, त्यामुळेच साधू-महंतांच्या बाबतीत वागणे संवेदनशील असताना जिल्हाधिकार्यांनी मात्र मुक्ताफळे उधळली. इतकेच नव्हे तर साधू-महंतांची योग्यता तपासण्याची भाषा केल्याने नाशिकमधील साधू-महंतांमध्ये … - चारी फुटल्याने पाणी वाया गेल्याची तक्रार लोकमत - ३ तास पूर्वी
लोहोणेर - चणकापुर उजव्या कालव्याव्दारे खालप डी.वाय. टेल साठी सोडण्यात आलेले पाणी मध्ये चारी फुटल्याने खालप पर्यंत पुर्ण क्षमतेने न पोहोचता इतरत्र वाहुन गेल्याने या परिसरातील शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- ‘जाणीव’ पुरस्काराने वीस व्यक्तींचा गौरव जाणीव सांस्कृतिक … लोकमत - ४ तास पूर्वी
नाशिक : जाणीव सांस्कृतिक अभियानच्या वतीने राज्यातील विविध भागांमध्ये सामाजिक, राजकीय, प्रशासकीय आदि क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना ‘जाणीव’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी राज्यातील विविध शहरांमधील वीस व्यक्तींना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
- कंटेनरच्या धडकेत युवक ठार लोकमत - ४ तास पूर्वी
सिडको : मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळच्या मार्गाजवळ शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास कंटेरनरच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला, तर युवकाचे वडील गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातानंतर संतप्त नागरिकांनी दोन तास रास्ता रोको केल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
- शाकंबरी नदीच्या पुलाखालून वाळू चोरी लोकमत - ४ तास पूर्वी
नांदगाव : शाकंबरी नदीवर चार कोटी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या पुलाखालीच वाळूची चोरी करण्याचा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरु असून, शासकीय यंत्रणा मात्र मूग गिळून बसल्याचे चित्र आहे. आमदार पंकज भुजबळ निवडून आल्यानंतर एका महिन्यात आलेल्या महापुराने आधीचा पूल उद्ध्वस्त केला होता. त्या जागी दोन नद्यांवरून जाणारा पूल अवघ्या दहा महिन्यांत तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उभा केला होता.
- थेंब थेंब मी पाण्याचा, सार्या जनास वाटला. लोकमत - ४ तास पूर्वी
.संजय वाघ , नाशिक
एकीकडे पाण्याचा मुबलक स्रोत तर दुसरीकडे कोरड्याठाक विहिरी. टंचाईग्रस्त भागांतील जनता पाण्यावाचून कासावीस होत असताना व सभोवताली पाणी विक्रीच्या माध्यमातून तुंबडी भरली जात असताना पैशांवर कोण पाणी सोडेल. परंतु, यास एक जलदाता अपवाद आहे. कोणत्याही प्रसिद्धीविना त्याच्या या जलदानाची मोहीम गेल्या १0 वर्षांपासून अव्याहत सुरू आहे. - कॅम्प रस्त्यावर पुन्हा खड्डय़ांचे साम्राज्य लोकमत - ४ तास पूर्वी
कॅम्प रस्त्यावर पुन्हा खड्डय़ांचे साम्राज्य
- मालेगावी वातावरण बदलास प्रारंभ लोकमत - ४ तास पूर्वी
- कालचा गोंधळ बरा होता? लोकमत - ४ तास पूर्वी
अखेर जकात हद्दपार झाली आणि एलबीटी लागू झाला आहे. जकात रद्द केली म्हणून आंनद व्यक्त करायचा की एलबीटीतील गोंधळामुळे रोष व्यक्त करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जकात रद्दची मागणी होत आहे. परंतु त्याचा उपयोग झाला नाही आणि एकदाची जकात रद्द होऊन एलबीटी लागू झाला आणि नव्याच गोंधळाला सुरूवात झाली. गेल्यावर्षी नाशिकसह सर्वच महापालिकांना एलबीटी लागू होण्याची तयारी सुरू झाली आणि गोंधळाला सुरुवात झाली. एलबीटी कसा असेल, त्यातून कोणती तरतूद आहे. कर चुकविला …
- बाल वाचक कक्षास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लोकमत - ४ तास पूर्वी
- पटेलनगरवासीय पाण्यासाठी त्रस्त लोकमत - ४ तास पूर्वी
- निहालनगर भागात कचर्याचे ढीग लोकमत - ४ तास पूर्वी
नाशिक
ताज्या बातम्या
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4
