शोधा

देश

पक्ष पंतप्रधानांच्या पाठीशी

आक्रमण हाच काँग्रेसच्या बचावाचा सर्वाेत्तम पवित्रा असेल, याची कठोर प्रचिती देतानाच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अनेक राजकीय तर्क गाडून टाकत पक्ष पूर्णत: पंतप्रधानांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. त्याच वेळी ‘आम आदमी’च्…

गोमंतकीय कन्येने शोधला ‘टच फ्री’ फोन!

मोबाइल फोनवरून संदेश पाठवण्यासाठी यापुढे कदाचित मोबाइलला हात लावण्याचीही गरज पडणार नाही;…

विंदू हा पंटर नव्हे तर बुकीच..

मी फक्त पंटर आहे, असा छातीठोक दावा करणारा विंदू दारा सिंग चक्क एक बुकी असल्याचे भक्कम पुरावे गुन्हे शाखे…

‘संपुआ’ने मांडला जनतेसमोर लेखाजोखा

सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने बुधवारी घोटाळ्य़ांच्या आरोपांची राळ दूर सारत मागील नऊ वर्षांच्या काळातील…

ताज्या बातम्या

  • विंदू हा पंटर नव्हे तर बुकीच.. लोकमत - ११ तास पूर्वी
    विंदू हा पंटर नव्हे तर बुकीच..

    मी फक्त पंटर आहे, असा छातीठोक दावा करणारा विंदू दारा सिंग चक्क एक बुकी असल्याचे भक्कम पुरावे गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत. भारतीय सट्टाबाजारात जॅक या नावाने ओळखल्या जाणार्‍या विंदूकडे सट्टा लावणारे कोण, याचा शोध गुन्हे शाखा घेत आहे. विंदूचे ठराविक पंटर बॉलीवूडमधले जानेमाने चेहरे असावेत, असा संशय गुन्हे शाखेला आहे.

  • गोमंतकीय कन्येने शोधला ‘टच फ्री’ फोन!

    मोबाइल फोनवरून संदेश पाठवण्यासाठी यापुढे कदाचित मोबाइलला हात लावण्याचीही गरज पडणार नाही; कारण तुमच्या भावना व हावभाव ओळखणारा आणि त्याचे संदेशात परिवर्तन करणारा नवा ‘टच -फ्री’ स्मार्ट फोन बाजारात येण्याची शक्यता असून, ही किमया सध्या अमेरिकेतील एमआयटी या विश्‍वविख्यात संस्थेशी निगडीत असलेल्या अँड्रीया कोलॅसो या गोमंतकन्येने साधली आहे.

  • पक्ष पंतप्रधानांच्या पाठीशी लोकमत - ११ तास पूर्वी
    पक्ष पंतप्रधानांच्या पाठीशी

    आक्रमण हाच काँग्रेसच्या बचावाचा सर्वाेत्तम पवित्रा असेल, याची कठोर प्रचिती देतानाच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अनेक राजकीय तर्क गाडून टाकत पक्ष पूर्णत: पंतप्रधानांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. त्याच वेळी ‘आम आदमी’च्या हिताचे कायदे संसदेत मंजूर करण्यात बाधा आणणार्‍या भाजपावर त्यांनी घणाघाती टीका केली.

  • ‘संपुआ’ने मांडला जनतेसमोर लेखाजोखा

    सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने बुधवारी घोटाळ्य़ांच्या आरोपांची राळ दूर सारत मागील नऊ वर्षांच्या काळातील विकासकामांचा आढावा घेताना देशातील जनतेसमोर सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला.

  • बसपाच्या मायावतींना क्लीनचिट नाही

    उत्तर प्रदेशात सुधारणावादी नेत्यांची स्मारके उभारण्यात झालेल्या १४१0 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख व माजी मुख्यमंत्री मायावती यांना क्लीनचिट दिलेली नाही, असे उत्तर प्रदेशचे लोकायुक्त न्या. एन.के. मेहरोत्रा यांनी स्पष्ट केले आहे.

  • सीबीआय मैदानात ? लोकमत - १३ तास पूर्वी

    आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या कारवाईचे श्रेय लाटण्यावरून दिल्ली व मुंबई पोलिसांत जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. त्याकडे पाहताना आता करावे तरी काय अशा द्विधा अवस्थेत केंद्रीय गृह मंत्रालय अडकले आहे. त्यातून सुटका करून घेण्यास व पोलिसांची साठमारी थांबविण्यासाठी हा सारा तपास सीबीआयकडे सोपविला जाऊ शकतो.

  • आवाजाच्या वेगापेक्षाही अधिक वेगवान असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची गोव्याच्या समुद्र किनार्‍यावर बुधवारी यशस्वी चाचणी करण्यात आली व देशाच्या मुकूटात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

  • रालोआचे तळ्यात-मळ्यात! लोकमत - १४ तास पूर्वी

    रालोआच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेतली असली तरी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे देखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कायम आहेत.

  • शहरांच्या हद्दीत प्रवासी वाहतूक करण्यासाठी ‘क्वाड्रिसायकल’ नावाच्या एका नव्या प्रकारच्या चार चाकी वाहनास परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला. यामुळे लवकरच देशातील शहरांमध्ये तीन चाकी रिक्षांऐवजी ही नवी चारचाकी वाहने भाडोत्री प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यांवर अवतरतील.

  • वित्तीय नियमनाचा सर्वंकष कायदा

    फसव्या गुंतवणूक योजनांमुळे सर्वसामान्य जनतेला जबर नुकसान होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्‍वभूमीवर वित्तीय क्षेत्राच्या नियमनातील तफावत दूर करण्याची गरज असून, संपूर्ण वित्तीय क्षेत्रासाठी एक नवीन कायदा करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जात आहेत, असे वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले.

  • भारतातील प्राप्तिकर विषयक धोरण, त्यातील कलमे समजून घेण्यासाठी भारत सरकारने विशेष मार्गदर्शन शिबिरे घ्यावीत व व्यापक मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा ८६ टक्के जागतिक कंपन्यांनी वर्तविली आहे. ग्रँट थार्नटन इंटरनॅशनल बिझनेस या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही सूचना केली आहे.

  • ‘एचएसबीसी’ला दंड लोकमत - १४ तास पूर्वी

    ग्राहकाने कर्जाची संपूर्ण फेड केल्यानंतरही त्याचे खाते सुरू ठेवत त्याच्याकडून व्याज आकारणी करण्याचा प्रयत्न करणार्‍या एचएसबीसी बँकेला या प्रकरणी गैरव्यवहाराचा ठपका ठेवत नवी दिल्ली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ५.५ लाख रुपयांचा दंड सुनावला आहे.

  • सोने होणार आणखी स्वस्त ! लोकमत - १४ तास पूर्वी
    सोने होणार आणखी स्वस्त !

    जागतिक बाजारात सोन्याच्या भावात आणखी घसरण झाल्याने केंद्र सरकारने सोन्याच्या शुल्कात आणखी घट केली आहे. त्यामुळे सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

  • रेल्वेतील १० कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कॉन्ट्रक्टरला दिल्ली न्यायालयाने १ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सूनावली आहे. माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचा भाचा आणि कॉन्ट्रक्टर सुशील डागा या दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.

आणखी ताज्या बातम्या »