- सिंहगड इन्स्टिट्युटच्या इमारती पाडण्याचे आदेश लोकमत - २३ तास पूर्वी
सिंहगड इन्स्टिट्युटने मावळ तालुक्यातील कूसगाव येथे खाजगी वन जमिनीवर अतिक्रमण करुन कॉलेज व हॉस्टेलच्या इमारती बांधल्या आहेत. या इमारती त्वरित जमीनदोस्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिले आहेत.
- सभेला बसण्यास परवानगी देण्याची फुगेंची मागणी लोकमत - २३ तास पूर्वी
बनावट जातप्रमाणपत्र दखल करून निवडणूक लढल्याप्रकरणी नगरसेवकपद गमावण्याची वेळ आलेल्या सीमा फुगे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. नगरसेवकपद रद्द करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना नाहीत या मुद्द्यावर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
- भर पावसातही ३,९0१ अर्ज जमा लोकमत - २३ तास पूर्वी
अकरावीचे प्रवेशअर्ज जमा करण्यासाठी अवघे दोनच दिवस उरल्याने विद्यार्थ्यांची धांदल उडू लागली आहे. दिवसभर पाऊस असतानाही विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्ज भरण्यासाठी केंद्रांवर मोठी गर्दी केली. मंगळवारी दिवसभरात शहरातील ४ केंद्रांवर ३ हजार ९0१ अर्ज जमा झाले.
- तीन अधिकारी निलंबित लोकमत - २३ तास पूर्वी
चिखली, जाधववाडीतील अवैध बांधकामाच्या मागील तारखेच्या (बॅकडेटेड) नोंदी केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने तीन अधिकार्यांना निलंबित, तर लिपिकाला दंड केला आहे.
- भोसरी निवडणूक अर्जांची आज छाननी लोकमत - २३ तास पूर्वी
गत निवडणुकीत भाजपतर्फे उमेदवारी मिळालेल्या पण जात प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने अर्ज बाद झालेल्या श्रद्धा लांडे यांना भोसरी प्रभाग क्रमांक ३५च्या पोटनिवडणुकीसाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
- विशेष कार्यकारी अधिकारी घाबरले लोकमत - २३ तास पूर्वी
जिल्हाधिकार्यांमार्फत नेमणूक करण्यात येणार्या विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी १२ वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता आवश्यक असल्याचा अध्यादेश राज्य शासनाने नुकताच काढला आहे.
- भोंदुबाबाला अटक लोकमत - २३ तास पूर्वी
घरातील सर्व अडचणी दुर करतो, असे अमिष दाखवत महिलेकडून साडे नऊ लाख उकळणार्या भोंदु बाबाला सांगवी पोलिसांनी आज रात्री अटक केली. त्याच्याकडून १ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
- इंदापुरातील आठवडे बाजार होणार सक्षम लोकमत - २३ तास पूर्वी
आठवडे बाजारात मूलभूत सुविधा देऊन ‘शेतकरी ते ग्राहक’ अशी शेतमाल विकण्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना बाजारपेठा उपलब्ध होतील. जागतिक बँकेच्या सहाय्याने इंदापूर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींना या सुविधांसाठी १ कोटी ५0 लाख रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे, अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
- सोडा उडाल्याने खून करणार्यास जन्मठेप लोकमत - २३ तास पूर्वी
बिअरबारमध्ये दारू पीत असताना, सोडा उडाल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप व दहा हजार रुपये दंड व त्याच्या साथीदारास १ वष्रे सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. टेकाळे यांनी सुनावली आहे.
- शिक्षण सेवा राजपत्रित अधिकार्यांचे अधिवेशन लोकमत - २३ तास पूर्वी
अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाचे दुसरे वार्षिक अधिवेशन येत्या २२ व २३ जून रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
- बहि:स्थ विद्यार्थी प्रवेशाबाबत फेरविचार लोकमत - बुध, १९ जून २०१३
- महापालिकेला एलबीटीचा झटका लोकमत - बुध, १९ जून २०१३
जकात रद्द करून एलबीटी लागू केल्यानंतर महापालिकेस मिळणा-या उत्पन्नात मोठी घट झालेली आहे. एलबीटीविरोधात व्यापा-यांनी पुकारलेल्या ‘बंद’बाबत तोडगा निघूनही नोंदणी करण्याकडे व्यापार्यांनी पाठच फिरविल्याने, महापालिकेस एलबीटीमधून १ एप्रिल ते १८ जून या अडीच महिन्यांच्या कालावधीत केवळ ७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
- रस्तादुभाजकाचा निधी पाण्यात लोकमत - बुध, १९ जून २०१३
महापालिकेने संगमवाडी ते सादलबाबा चौकापर्यंतच्या नव्या रस्त्याचे वर्षभरापूर्वी उद्घाटन केले. मात्र, नियोजनाचा अभाव असल्याने, रस्त्यात लाखो रुपये खचरून दुभाजक उभारण्यात आला. आता बीआरटी मार्ग उभारण्यासाठी ऐन पावसाळ्यात दुभाजक काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे.
- मुसळधार पावसाने उडवली दाणादाण लोकमत - बुध, १९ जून २०१३
सलग पाचव्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसाने पुण्यात दाणादाण उडवली. सायंकाळी झालेल्या धो..धो. पावसाने रस्ते पाण्याखाली गेले होते आणि सगळ्याच रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावसाळी गटारे तुंबल्याने प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान अवघ्या एका तासामध्ये ११.७ मिमी पाऊस पडला.
पुणे
ताज्या बातम्या
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4


