शोधा
  • गोंधळलेली मुलं जबाबदार कोण?

    लोकमत - गुरु, १६ मे २०१३

    येता-जाता मुलांवर लक्ष ठेवणं, त्यांची प्रत्येक हालचाल मॉनिटर करणं त्यांची मतं, निर्णय यात लुडबुडणं त्यांच्या पसंती-नापसंती नाकारणं यामुळे मुलं घडतात की गोंधळतात?

    ब्लॉगिंग हे फक्त मोठय़ांचं क्षेत्र आहे, असा एक अलिखित संकेत निदान भारतात तरी रूढ झालेला आहे. लेखक-पत्रकार किंवा सर्वसामान्य माणसं ज्यांची अभिव्यक्ती सहज-सुंदर आहे ती मंडळी विविध विषयांवर ब्लॉग लिहितात आणि जगभरात पसरलेले अगणित वाचक ते वाचतात. ब्लॉगबद्दल आपलं ज्ञान इतपतच सीमित स्वरूपाचं आहे; पण जगभरात मोठय़ांइतकंच मुलंही ब्लॉगिंगमध्ये व्यस्त आहेत. सहा-सात वर्षांंपासून ते तेरा वर्षांंपर्यंंतची मुलं स्वतंत्रपणे किंवा आई-बाबांपैकी एकाच्या सोबतीनं ब्लॉग चालवताना दिसतात.
    आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही चिमुकली पोरं असं लिहितात तरी काय ब्लॉगवर? आणखी »गोंधळलेली मुलं जबाबदार कोण?

  • कडेवर घ्यायला आई हवीय आणि गोष्टी सांगायला आज्जी!

    लोकमत - गुरु, १६ मे २०१३

    त्यांना आधार मिळतो, डोईवर छप्पर मिळतं, दोनवेळचं पोटभर अन्न आणि कपडे मिळतात.. पण या मुलांना कडेवर उचलून घ्यायला, त्यांच्याशी खेळायला, गप्पा मारायला कुणी नाही. आपल्याला आई- आजी- बहीण नाही, म्हणून हिरमुसलेल्या मुलांच्या आयुष्यात नवी नाती आणण्यासाठी चाललेल्या एका धडपडीची कहाणी..

    जागतिक कुटुंबदिन कालच साजरा झाला.. त्यानिमित्तानं नात्यांच्या शोधातल्या एका ‘कुटुंबा’ची ही कहाणी आणखी »कडेवर घ्यायला आई हवीय आणि गोष्टी सांगायला आज्जी!

  • देशी-परदेशी पॅशनफ्रूट, किवी आणि जांभूळ

    लोकमत - गुरु, १६ मे २०१३

    उन्हाळ्यात सतत लागणारी तहान जीव कासावीस करते.आज बाजारात उत्तम आणि हलक्या चवींची देशी-परदेशी फळं उपलब्ध आहेत.जी त्यांच्या गरांनी आणि सरबतांनी तहान शमवतात आणि आरोग्यही राखतात.

    उन्हाळ्यामध्ये सतत तहान लागत असते आणि ती शमविण्यासाठी पाणी तर असतंच; पण फळांची सरबतंही हवीहवीशी वाटतात. अशा सरबतांमध्ये अत्यंत वेगळ्या; पण ताज्या चवीचं आणि क जीवनसत्त्व भरपूर असलेलं फळ म्हणजे पॅशनफ्रूट, क जीवनसत्त्वाचा खजिनाच असं वर्णन ज्याचं करता येईल असं फळ किवी आणि अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असं जांभूळ, या सगळ्यांची माहिती आज घेऊ या. आणखी »देशी-परदेशी पॅशनफ्रूट, किवी आणि जांभूळ

पृष्ठांकन

(50 वृत्त)