शोधा
  • फास्ट ट्रॅक कोर्ट किती फास्ट ?

    लोकमत - सोम, ४ फेब्रुवारी २०१३

    न्याय मिळणे हेच पुरेसे नसते. न्याय होत आहे हे दिसायला हवे. तसेच न्याय लवकर मिळायला हवा, तो योग्य कालावधीत, योग्य वेळी मिळायला हवा. पण आपल्या देशात परिस्थिती अशी आहे की कोणतेही प्रकरण न्यायालयात नेणे म्हणजे न्याय मिळण्यास विलंब होणे. अनेक वर्षे खटला चालल्यानंतरच न्याय पदरात पडत असतो. एखादा खटला दहा वर्षे, वीस वर्षे, तीस वर्षे नव्हे तर पुढील पिढीपर्यंत चालल्याची अनेक उदाहरणे आहेत. आणखी »फास्ट ट्रॅक कोर्ट किती फास्ट ?

  • दुष्काळ

    लोकमत - रवि, ३ फेब्रुवारी २०१३

    महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाणीटंचाईची भीषण परिस्थिती पर्यायाने दुष्काळाचे सावट निर्माण झालेले आहे.
    दरवर्षी महाराष्ट्रात निर्माण होणार्‍या या परिस्थितीचे डोळसपणाने अवलोकन करण्याची
    आणि त्यादृष्टीने काही ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
    पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा विचार करताना आणि त्यावर उपाययोजनांची चर्चा करताना
    एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, जलव्यवस्थापनासाठी सक्षम मनुष्यबळाच्या अभावाची.
    त्यादिशेने खरोखर आपण हा मनुष्यबळाचा दुष्काळ तरी रोखू शकू?..
    याविषयी भूशास्त्राच्या एका अभ्यासकाने शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले हे विश्लेषण..
    एकविसाच्या शतकात युद्धे होतील ती पाण्याच्या प्रश्नावर’ हे विसाव्या शतकाच्या उंबरठय़ावर वर्तविलेले भाकीत प्रत्यक्षात येत आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या दाहकतेबरोबर किंवा दुष्काळाची चाहूल लागताच शेताचे बांध, गावांच्या, तालुक्यांच्या, जिल्ह्यांच्या आणि प्रांताच्या सीमा धगधगू लागल्या आहेत. या धगीची ऊब मतांमध्ये परिवर्तित करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावत आहेत. यातून धगीचे रूपांतर वणव्यात होणार. त्यांना धरणे, मोर्चे, दगडफेक, गोळीबार आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती प्रसिद्धिमाध्यमांना विषय पुरवले जाणार. या गदारोळात उन्हाळी महिने पुढे सरकत जाणार, आकाशात ढग जमू लागणार आणि वळवाच्या सरींबरोबरच मॉन्सून सक्रिय होणार. पाण्याची उपलब्धता वाढू लागताच दुष्काळाची दाहकता भौगोलिक परिस्थितीप्रमाणे काही ठिकाणी कमी, तर काही ठिकाणी नाहीशी होणार. त्याचबरोबर, जलसंपत्तीचे नियोजन आदि विषय सरकारी फायलीत लुप्त होणार. जलसंपत्तीचे शाश्‍वत (sustainable) नियोजन, पाणलोट क्षेत्रविकास, कायमस्वरूपी उपाययोजना, सर्वंकष धोरण इत्यादी आश्‍वासक शब्द दैनंदिन जीवनात अनुभवता न आल्यामुळे बोथट झालेले शब्द जनताही विसरणार!
    दुष्काळाची कारणमीमांसा :
    महाराष्ट्राला दुष्काळ नवा नाही. नव्हे, तो पाचवीलाच पुजला आहे. १८८३च्या दुष्काळात महात्मा फुलेंना ‘पाणी अडवा-आणि जिरवा’ अशी घोषणा द्यावी लागली होती. त्यानंतर तब्बल शंभर वर्षांनी १९८३च्या दुष्काळातही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादांना हीच घोषणा करावी लागली. यंदाही तेच आणि उद्याही हेच चित्र असणार आहे. कारण, वाढती लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली, कारखानदारी, विद्युतनिर्मिती, शेती या सर्वांमुळे पाण्याची मागणी वाढतच जाणार आणि वाढत्या मागणीबरोबर संघर्ष धारदार होऊ लागणार, यात शंकाच नाही.
    पाणलोट क्षेत्रातील विविधता :
    महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा विचार करताना पश्‍चिमेकडील कोकणातील समुद्रकिनार्‍यालगतच्या … आणखी »दुष्काळ

  • नौदलाची विजयी शर्थ

    लोकमत - रवि, ३ फेब्रुवारी २०१३

    १९७१ च्या भारत-पाक युद्धामध्ये भारताच्या नौदलाचा पराक्रम अतुलनीय असा होता. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांची जबरदस्त नाकेबंदी करून कराची बंदराला अक्षरश: भाजून काढले. चितगाव व ढाका पाडले.
    त्यानंतरच बांग्लादेशाची निर्मिती झाली. या दिवसातील नौदलाच्या लढाईमध्ये अतुलनीय धाडस, कार्यक्षम कर्तृत्व गाजवून विशिष्ट सेवा मेडल मिळवून सन्मानित केलेले कमांडर विनायक आगाशे यांनी सांगितलेल्या थरारक आठवणी.
    ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर लादलेले युद्ध १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने जिंकले. हे पंधरा दिवस निर्णायक विजयाची आठवण करून देतात. भारतीय लष्कराच्या विलक्षण समन्वयातून युद्ध निर्णायक ठरले. या पराक्रमातील भारतीय नौदलाचा सिंहाचा वाटा नजरेआड करता येणार नाही. अत्यंत वेगाने आणि फार कमी वेळेत प्रथम बंगालच्या उपसागरात आणि नंतर अरबी समुद्रात आपल्या आरमारी सज्जतेची चुणूक दाखविली गेली. चितगाव पाडण्यात आणि कराचीला घेरण्यात तसेच कित्येक पाक युद्धनौकांना पाणबुड्यांना जलसमाधी देण्यात नौदलाने अतुलनीय साहस दाखविले. या युद्धात सहभागी झालेले कमांडर विनायक आगाशे त्या वेळी आयएनएस विक्रांत, आयएनएस म्हैसूर तसेच पाणबुडीविरोधी विनाशिका कुठारवर विविध जबाबदार्‍यांवर तैनात होते. पुढील वर्षात त्यांनी ‘वाघली’ आणि ‘वेला’ या पाणबुड्यांचे नेतृत्वही केले.
    ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१. अवघे चौदा दिवस. वेगवान घडामोडींनी भारताची तिन्ही सैन्यदले ढवळून निघालेली. युद्धइतिहासात १९७१ चे भारत-पाक युद्ध हे घडामोडींचा विलक्षण वेग, धोरणात्मक व्यूहरचना आणि अतिउत्तम समन्वय या तिन्ही दृष्टींनी अविस्मरण ठरले. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमधल्या श्रेष्ठ दर्जाच्या समन्वयाने आपल्याला विजय मिळवून दिला. हिंदुस्थानी सैन्यानं लष्करी लढाई जिंकण्याचा हा क्षण शेकडो वर्षांनी अवतरला हेाता. जगातील एका महत्त्वपूर्ण खंडाचा राजकीय-भौगोलिक नकाशा बदलून टाकणारे हे निर्णायक युद्ध होते. बांग्लादेशाच्या निर्मितीत हे सारे घडले होते. हा विजय केवळ युद्धातला नव्हता. राजकीय इच्छाशक्तीतून कसे राष्ट्रीय उद्दिष्ट साधले जाऊ शकते आणि संघभावनेतून एखादे युद्ध कसे ‘लाईटनिंग’ ठरू शकते याचा प्रत्यय देणारे हे युद्ध होते.
    अशा या युद्धाशी प्रत्यक्ष संबंध आल्यामुळे त्या अभिमानास्पद क्षणांची वारंवार आठवण होते आहे. नौदल अधिकारी म्हणून आयुष्य सार्थकी लागले अशा गौरवाच्या भावना या निमित्ताने दाटून येतात.
    १९४७ च्या फाळणीनंतर पूर्व बंगाल हे पूर्व पाकिस्तान बनले. तिथे बंगाली बोलणारी मुस्लीम मंडळी बहुसंख्याक होती. भूभाग ही कसा अगदी … आणखी »नौदलाची विजयी शर्थ

पृष्ठांकन

(50 वृत्त)