- पाणी योजनेसाठी निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय लोकमत - सोम, २० मे २०१३
उमदी : म्हैसाळचे पाणी शिवारात आल्याशिवाय मतदान करणार नाही, मतपेटय़ा मोकळ्या पाठवू, प्रसंगी बहिष्कार चळवळीमध्ये सहभागी न होणा:या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर काळे ङोंडे दाखवू, असा इशारा बालगाव व बेळोंडगी (ता. जत) या गावांनी दिला आहे.
बालगाव व बेळोंडगी येथे म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्याबाबत जाहीर सभा व बैठक घेण्यात आली. यावेळी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला. - आज मध्यरात्री होणार जकात बंद लोकमत - सोम, २० मे २०१३
सांगली : गेली सात ते आठ दशके सांगली, मिरज शहराच्या हद्दीवर सुरु असलेल्या जकातीची वसुली उद्या, सोमवारी मध्यरात्रीपासून बंद होऊन स्थानिक संस्था कर (एलबीटी)ला सुरुवात होईल. या नव्या करासाठी पात्र असलेल्या आठ ते दहा हजार व्यापा:यांच्या यादीचे संकलन, त्यांच्या नोंदणीसाठी कार्यालये, कर्मचा:यांचे प्रशिक्षण आदींची जय्यत तयारी महापालिकेने हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात व्यापा:यांच्या नोंदणीवर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. त्यात व्यापा:यांनी एलबीटीविरोधात बेमुदत बंद पुकारल्याने नोंदणीला कितपत …
- मिरज-सांगलीत कर्नाटक बसेसची घुसखोरी.. लोकमत - सोम, २० मे २०१३
सदानंद औंधे ल्ल मिरज
कर्नाटक सीमेवर असलेल्या मिरज-सांगली शहरात कर्नाटक बसेसची घुसखोरी वाढत आहे. सांगली- मिरजेत दररोज सुमारे दोनशे कर्नाटक बसेस येतात, तर सांगली-मिरज डेपोतून केवळ 24 बसेस कर्नाटकात जातात. विनापरवाना येणा:या कर्नाटक बसेसना प्रतिबंध करणो एसटी अधिका:यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. - एलबीटी : मुख्यमंत्र्यांशी चर्चा - प्रतीक पाटील लोकमत - सोम, २० मे २०१३
सांगली : एलबीटीबाबत मार्ग काढण्यासाठी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी व्यापा:यांना दिले
- मिरजेत व्यापा:यांचा रेल रोको लोकमत - सोम, २० मे २०१३
मिरज : एलबीटीविरोधात सांगली, मिरजेतील व्यापा:यांनी मिरज रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केले. आ. सुरेश खाडे यांच्यासह आंदोलकांनी बेंगलोर-गांधीधाम एक्स्प्रेस दहा मिनिटे रोखली. दरम्यान, एलबीटी हटावच्या मागणीसाठी आज सांगली-मिरजेत व्यापा:यांनी रॅली काढली.
- सिगारेट चोरटय़ांना सांगलीत अटक लोकमत - सोम, २० मे २०१३
सांगली : मिरजेतील मेसर्स नॅशनल ट्रेडर्स दुकान फोडून चार लाखांची सिगारेटस् चोरणा:या दोन चोरटय़ांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. त्यांच्याकडून सिगारेटचा साठा, अॅपे पॅगो रिक्षा असा एकूण सात लाखांचा माल जप्त केला आहे.
- पोलीस भरती; 21 रोजी यादी प्रसिध्द होणार लोकमत - सोम, २० मे २०१३
सांगली : पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी परीक्षेत पात्र ठरलेल्या महिला व पुरुष उमेदवारांची गुणवत्ता यादी 21 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, ती पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर लावण्यात येणार आहे, अशी मािहती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दिली.
- एमएस्सी प्रवेश परीक्षेचा फज्जा लोकमत - सोम, २० मे २०१३
सांगली : शिवाजी विद्यापीठातर्फे आज झालेल्या एमएस्सीच्या प्रवेश परीक्षेचा फज्जा उडाला़ अचानक सव्र्हर डाऊन झाल्याने एमएस्सीची ऑनलाईन होणारी प्रवेश परीक्षा ऑफलाईन झाली़ सकाळी नऊ वाजता सुरू होणारी ही परीक्षा दुपारी साडेबारा वाजता सुरू झाल्याने तब्बल साडेतीन तास उशीर झाला़
- सांगलीत गोळीबार; एक जखमी दोन लोकमत - सोम, २० मे २०१३
सांगली : जागेचा ताबा घेण्याच्या वादातून गणोश लक्ष्मण अपराध (वय 58, रा. रुकडी, ता. हातकणंगले) याने गोळीबार केला. यात त्याचा मोठा भाऊ चंद्रकांत लक्ष्मण अपराध (65, कुपवाड) जखमी झाला. आंबेडकर रोडवरील अनंतगंगा भवनमागे भगतसिंग चौकात आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. चौघांना अटक केली आहे. यामध्ये मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणो यांच्या मुलावरही गुन्हा दाखल झाला आहे.
- शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सदोष, दोन विषयांत चांगले गुण … लोकमत - शनि, १८ मे २०१३
शिराळा। दि. 17 (वार्ताहर)
पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल काल इंटरनेटवर जाहीर झाला. मात्र अनेक हुशार व शिष्यवृत्तीस पात्र ठरणा:या विद्याथ्र्याना गणित व सामाजिक शास्त्र विषयात शून्य गुण मिळाले आहेत. या प्रकारची गुणपद्धती चुकीची असण्याची शक्यता असून, याचा फटका हुशार मुलांना बसणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संगणकावरील गुणपद्धतीमधील दोष शोधून या विद्याथ्र्याच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याची मागणी पालकांतून होत आहे. - शेतक:यांनी दिल्या स्वखुशीने जमिनी सोनसळ डाव्या कालव्यासाठी … लोकमत - शनि, १८ मे २०१३
कडेगाव। दि. 17 (वार्ताहर)
कडेगाव तालुक्यातील चिंचणी (अंबक) येथील शेतक:यांनी अडथळा आणल्यामुळे सोनसळ डाव्या कालव्याचे काम रखडले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी चिंचणीतील युवकांनी पुढाकार घेऊन शेतक:यांशी संवाद साधून कामाला सुरुवात केली. काही ठिकाणी अडथळा ठरणा:या शेतक:यांच्या लगतच्या हिश्श्यातील पाच शेतक:यांनी जमीन संपादन झालेली नाही, तरीही स्वखुशीने दिली. - शैक्षणिक शुल्क घेतल्यास फौजदारी, इस्लामपुरातील बैठकीत … लोकमत - शनि, १८ मे २०१३
इस्लामपूर। दि. 17 (वार्ताहर)
वाळवा तालुक्यातील ज्या शाळा 6 ते 14 वयोगटातील विद्याथ्र्याकडून परीक्षा व शिक्षणासाठी शुल्क आकारतील, त्यांच्याविरुध्द दहापट दंड वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी एल. एस. पोले यांनी दिला. या बैठकीतच त्यांनी शहरातील एका नावाजलेल्या शाळा व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले. - बेवारस मृतदेहांचे पोलीस बनले नातेवाईक, सांगली जिल्ह्यात … लोकमत - शनि, १८ मे २०१३
सचिन लाड। दि. 17 (सांगली)
वारस असूनही बेवारस बनलेल्या व्यक्तींची मृत्यूनंतरही परवड थांबत नसल्याचे चित्र आहे. कोणतीही घटना, दुर्घटना असो अथवा अपघात.. घटनास्थळी पहिली यंत्रणा पोहोचते, ती म्हणजे पोलिसांची. ‘सबका मालिक एक’, या साईबाबांच्या संदेशाप्रमाणो पोलिसांना त्यांची भूमिका बेवारस मृतदेह सापडल्यानंतरही पार पाडावी लागत आहे. - घनकचरा प्रकल्पाचे घोंगडे भिजतच, दोनदा निविदा रद्द; … लोकमत - शनि, १८ मे २०१३
शीतल पाटील। दि. 17 (सांगली)
कधी ठेकेदाराला पोषण अटी व शर्ती.. तर कधी निविदा दरांचा घोळ.. अशा विविध कारणांमुळे गेली दोन वर्षे महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे. आता स्वीडनच्या सल्ल्याने प्रस्तावात बदल करून नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचे पालिका सूत्रंनी सांगितले.
सांगली
ताज्या बातम्या
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4
