- मलेशियात शीख संमेलन लोकमत - ११ तास पूर्वी
मलेशियाच्या मलाका प्रांतात पुढील आठवड्यात शीख धर्मगुरू संत बाबा सोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
- १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू लोकमत - ११ तास पूर्वी
शालेय बसला आग लागून १७ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा होरपळून मृत्यू झाला. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ही भीषण दुर्घटना घडली. गॅस सिलिंडरमधून गळती झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते. गुजरानवाला शहराजवळ घडलेल्या या दुर्घटनेमध्ये सात विद्यार्थी जखमी झाले.
- पाकिस्तान- स्कूलबसमध्ये सिलिंडरच्या स्फोटात १७ ठार लोकमत - शनि, २५ मे २०१३
पूर्व पाकिस्तानातील गुजरात शहरापासून काही अंतरावर स्कूल बसमधील गॅस सिलिंडिरचा स्फोट झाल्याने सुमारे १७ विद्यार्थी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली.
- मॉस्कोला भूकंपाचा धक्का लोकमत - शनि, २५ मे २०१३
रशियाच्या पूर्वेकडील समुद्रात आज झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला. हा भूकंप राजधानी मॉस्कोसह इतर अनेक शहरात जाणवला; मात्र यात कोणतीही हानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही.
- भूमीपुत्रांना नोकरी देण्याची सक्ती करणारा सौदी अरेबियाचा कायदा … लोकमत - शुक्र, २४ मे २०१३
निताकत कामगार कायदा सौदी अरेबियाने संमत केल्याचा परिणाम म्हणून हजारो भारतीय कामगार सौदी अरब सोडून मायदेशी येत आहेत.
- अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेत भारताचा झेंडा लोकमत - शुक्र, २४ मे २०१३
- कान्समध्ये चोरट्यांचा 'महोत्सव', ४० लाख डॉलरच्या दागिन्यांवर … लोकमत - शुक्र, २४ मे २०१३
जगभरातील सिनेसृष्टीतील तारक-तारकांच्या उपस्थितीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणा-या कान्स महोत्सवाला यंदा चोरट्यांचे गालबोट लागले आहे. यंदा या महोत्सवात चोरट्यांनी तब्बल ४० लाख डॉलरच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने आयोजक हतबल झाले आहेत.
- कोलंबियात बंडखोरांच्या हल्ल्यात १0 सैनिक ठार लोकमत - शुक्र, २४ मे २०१३
गस्त घालणार्या सैनिकांच्या पथकावर बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात किमान १0 सैनिक मारले गेले असून, सहा जखमी झाले आहेत. कमांडर जनरल जुआन पाब्लो यांनी दिलेल्या माहितीनुसार ईशान्य भागातील चितागा येथे गस्त घालणार्या पथकावर ईएलएन बंडखोरांनी पहाटे २ वाजता हल्ला केला.
- पाक स्फोटात सुरक्षा कर्मचार्यासह १२ ठार लोकमत - शुक्र, २४ मे २०१३
वायव्य पाकिस्तानातील क्वेट्टा येथून सुरक्षा कर्मचार्यांना घेऊन जाणार्या बसमध्ये बॉम्बस्फोट होऊन किमान १२ लोक ठार झाले व २0 जण जखमी झाले. हा बॉम्ब ऑटोरिक्षात ठेवण्यात आला होता.
- एव्हरेस्ट चढाईची भाऊगर्दी लोकमत - शुक्र, २४ मे २०१३
हिमालयातील ८,८४८ मीटर उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या जिद्दीने जगभरातून आलेल्या हौशी तसेच पट्टीच्या गिर्यारोहकांची सध्या या शिखराच्या पायथ्याशी गर्दी उसळली असून शेवटच्या बेसकॅम्पवरून शिखरावर पोहोचणारा गिर्यारोहक आणि शेरपा वाटाड्यांचा प्रत्येक चमू प्रत्यही दररोज नवा विक्रम प्रस्थपित करीत आहे.
- सामान्यज्ञान स्पर्धांत भारतीयांचे वर्चस्व लोकमत - शुक्र, २४ मे २०१३
स्पर्धकांच्या भूगोलविषयक सामान्यज्ञानाचा कस लावणारी ‘नॅशनल जिओग्राफिक बी कॉन्टेस्ट’ ही स्पर्धा सात्विक कर्णिक या १२ वर्षीय विद्यार्थ्याने जिंकून ‘नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’तर्फे घेतल्या जाणार्या ‘बी’ व ‘स्पेलिंग बी’ या अमेरिकेत अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या दोन्ही स्पर्धांमधील भारतीय वंशियांचा वरचष्मा कायम ठेवला आहे.
- लंडनमध्ये युद्ध सुरू करायचे होते लोकमत - शुक्र, २४ मे २०१३
लंडन शहरात लष्करी बराकीच्या बाहेर एका ब्रिटिश सैनिकाचा दोन हल्लेखोरांनी शिरच्छेद केल्याची घटना घडली. बुधवारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून आम्हाला आज लंडनमध्ये युद्ध सुरू करायचे आहे. आम्ही डोळ्यासाठी डोळा घेऊ व दातासाठी दात घेऊ, असे हल्लेखोरांनी जाहीर केले.
- लंडनमध्ये दहशतवादी हल्ला ? लोकमत - गुरु, २३ मे २०१३
लंडन येथे दोघा इस्लामी तरुणांनी ब्रिटीश सैन्यातील एका जवानावर प्राणघातक हल्ला करुन त्याची हत्या केल्याची घटना बुधवारी घडली. हत्येनंतर मारेक-यांनी अरबी भाषेत 'देव महान आहे' अशी घोषणा केल्याने हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
- म. गांधींच्या ३६ वस्तूंचा २.५ कोटींना लिलाव लोकमत - गुरु, २३ मे २०१३
विदेश
ताज्या बातम्या
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4



