अंधेरीत ऑईल कंपनीला भीषण आग

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १७ - अंधेरी येथील पनामा कंपाऊंडजवळ एका ऑईल कंपनीच्या इमारतीला सोमवारी सकाळी भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. या आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पनामा कंपाऊंड परिसरात अनेक ऑइल कंपन्या आहेत. त्यातील एका कंपनीला आज सकाळी आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.