अक्षयचा फिटनेस फंडा

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १ - अक्षयकुमार त्याच्या रावडी लूकसाठी ओळखला जातो; पण त्याचा हा लूक त्याने आतापर्यंत केलेल्या मेहनतीचा परिणाम आहे. अक्षय नेहमीच आपल्या आहारावर नियंत्रण ठेवत असतो. त्यामुळेच गेल्या कित्येक दिवसांपासून त्याने साधी मिठाईसुद्धा खाल्ली नाही. मिठाई खावी लागेल या भीतीने अक्षय पाटर्य़ाही कमीच अटेंड करतो. याबाबत अक्षय म्हणतो,'पैशांनी बरेच काही खरेदी करता येऊ शकते; ण चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे, असे तो म्हणतो.