अत्याचाराबाबत जागृती अभियान

जमीर काझीे। दि. २९ (मुंबई)

दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि राज्यभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना चर्चेचा विषय बनला असताना त्याला

प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारकडून राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जाणीवजागृती अभियान राबविण्यात

येणार आहे.

नव्या वर्षात ३ ते १२ जानेवारीदरम्यान चालणार्‍या या अभियानांतर्गत महानगरापासून ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रातील घटकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

महिलांचे हक्क आणि अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्रवासीयांसाठी प्रेरणादायी असलेल्या राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने १0 दिवसांचा हा उपक्रम राबविला जात आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबविला जात असून, त्यामध्ये स्त्रीभूणहत्या, लिंगभेद, बालविवाह, महिलांवरील शारीरिक, मानसिक, आर्थिक अत्याचार, बालकामगार, कौटुंबिक अत्याचार आणि राज्य कुपोषण मुक्तीबाबत माहिती दिली जाणार आहे.

असे राबविणार अभियान...

1एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत

राबविल्या जाणार्‍या या अभियानाची विभागणी जिल्हा, प्रकल्प व अंगणवाडी या तीन केंद्र स्तरांवर करण्यात आली आहे. या अभियानासाठी प्रत्येक दिवसागणिक राबवावयाचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे.

2राज्यभरातील या अभियानात प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुखांपासून महिला मंडळे आणि ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत प्रत्येक घटकाने सहभाग नोंदवावयाचा आहे.

3अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील न्यायाधीश, जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलीसप्रमुखांनी महिला व बालकांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन करावयाचे आहे. त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात प्रत्येक गावातील जनजागृतीसाठी प्रभात फेरी, परिसंवाद, एकांकिका यांचे आयोजन केले जाणार आहे.

स्त्रीभ्रूणहत्या, महिलांवर होणारे विविध प्रकारचे अत्याचार, बाल कामगार याबाबत समाजातील सर्व स्तरांवर जागृती करण्यासाठी हे जाणीवजागृती अभियान राबविले जाणार आहे. या उप्रकमात ग्रामीण भागातील तळाच्या घटकाचा सक्रिय सहभाग राहावा, यासाठी महिला मंडळे, अंगणवाडी केंद्रापर्यंत कार्यक्रम राबविला जात आाहे.

- डॉ. वर्षा गायकवाड,

महिला व बालविकास मंत्री