अवघड भूमिका

ऑनलाइन टीम

मुंबई, दि.१- विशाल भारद्वाजच्या 'मटरू की बिजली का मंडोला' या चित्रपटातील बिजली अर्थात अनुष्का शर्माची प्रत्येक जण प्रशंसा करत आहेत. या भूमिकेसाठी मिळणारी प्रशंसा ही तिच्या मेहनतीचे फळ आहे. आजवर केलेल्या भूमिकांपैकी बिजलीची भूमिका शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारी होती, असे अनुष्काचे म्हणणे आहे. विशाल भारद्वाज यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट ११ जानेवारीला रिलीज होत आहे. बिजलीची भूमिका साकारणे आजवरच्या कारकीर्दीतील सर्वात कठीण काम होते, असे अनुष्का सांगते. या भूमिकेसाठी भाषा आणि शारीरिक मेहनत करावी लागली. चित्रपटात अनुष्काने पंकज कपूर यांच्या बिघडलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे.