आणखी एक आरोपी जेरबंद

हिंगोली। दि. २८ (प्रतिनिधी)

कुळ जमिनीची वहिती करण्यावरून कोथळज शिवारात एका शेतकर्‍याचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी ८ आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करून एकास अटक केली होती. याच प्रकरणात गुरूवारी आणखी एकास अटक करण्यात आल्याची माहिती बासंबा ठाण्याचे प्रभारी अधिकारी फौजदार सागर इंगोले यांनी दिली.

हिंगोली तालुक्यातील कोथळज शिवारात २४ डिसेंबर रोजी सायंकाळी आठ जणांनी दिलीप मोतीराम भुक्तर (वय ५0) या शेतकर्‍याचा कुर्‍हाड, लोखंडी टॉमीने मारून खून केल्याप्रकरणी मयताची पत्नी वच्छलाबाई भुक्तर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यावरून आरोपी बाळू सीताराम देवकर, संतोष सीताराम देवकर, बाबाराव नागो जाधव, विश्‍वास दगडूजी बांगर, शामराव गणपत वाघमोडे, रघुनाथ नागो जाधव, सीताराम देवकर, सयाबाई सीताराम देवकर (सर्व रा.हिंगोली) यांच्याविरुद्ध खुनासह अँट्रॉसिटीचा गुन्हा बासंबा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.

उपविभागीय पोलिस अधिकारी रामराव हाके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी फौजदार सागर इंगोले यांनी आरोपी रघुनाथ जाधव यास अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

याच खून प्रकरणात २७ डिसेंबर रोजी आरोपी सीताराम देवकर यास अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याचे फौजदार इंगोले यांनी सांगितले.