आधार कार्डची प्रतीक्षा

मुरुड - अलीकडे शासनदरबारी असो वा बँका यांना के. वाय. सी. ची जरुरी भासते. आधारकार्डने चांगला आधार दिला असला तरी मुरुड तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे नागरिकांची कुरबूर आहे. गेल्यावर्षी मुरुड शहरासह अन्य गावांमध्ये आऊटसोर्सिंग कंपनीतर्फे आधारकार्डचा तपशील व फोटो काढण्यात आले. तथापि, बर्‍याच वाड्या, मोहल्ल्यातून ही टीम न पोहोचल्यामुळे बरीच मंडळी आधारकार्ड मिळण्यापासून वंचित आहे.