‘आरईसी’चे करमुक्त रोखे

नवी दिल्ली। दि. ३

(लोकमत न्यूज नेटवर्क)

सार्वजनिक क्षेत्रातील ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ लिमिटेड या कंपनीचे करमुक्त रोखे सोमवारी जारी करण्यात आले असून या रोख्यांतून विक्रीत ४,५00 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची कंपनीला अपेक्षा आहे.

करमुक्त आणि अपरिवर्तनीय रोखे जारी करून त्यातून ४,५00 कोटी रुपये मिळतील, अशी आशा आहे. या रोख्यांवर वार्षिक ७.२२ टक्के आणि ७.३८ टक्के व्याज दिले जाणार आहे. या रोख्यांची विक्री १0 डिसेंबर रोजी बंद होणार आहे.