इंग्लंडला पहिला धक्का, बेल आऊट

ऑनलाइन टीम

मोहाली, दि. २३ - येथे सुरू असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या इंग्लंडच्या संघाला पहिला धक्का बसला आहे. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज इयान बेल अवघ्या १० धावांवर बाद झाला आहे. इशांत शर्माने बेलला बाद केले असून इंग्लंडने अवग्या ४४ धावांत एक गडी गमावला आहे. सध्या खेळपट्टीवर कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक (२८) व पीटरसन(०) खेळत असून मालिकेत बरोबरी करण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिकण्याची गरज आहे. व त्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंना संयमित फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्यात हातभार लावावा लागणार आहे.

दरम्यान भारतीय संघात एकच बदल करण्यात आला असून अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे प्लस पॉईंटमध्ये असलेल्या यजमान संघाला रोखण्यासाठी इंग्लंडला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर यजमानांनी एकजुटीची वज्रमूठ घट्ट करत मालिकेत दमदार कमबॅक केले आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, रोहित शर्मा, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग, सुरेश रैना, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, भुवनेश्‍वर कुमार, अशोक डिंडा व शमी अहमद.

इंग्लंड : अँलेस्टर कुक (कर्णधार), जो रुट, इयान बेल, टीम ब्रेसनन, डॅनी ब्रिग्स, जोसफ बटलर, जेड डर्नबॅक, स्टिव्हन फिन, क्रेग किस्वेटर, स्टुअर्ट मिकर, इयॉन मॉर्गन, समित पटेल, केव्हिन पीटरसन, जेम्स ट्रेडवेल व क्रिक वोक्स.