ओबामाच!

वॉशिंग्टन। दि. 7 (वृत्तसंस्था)

जगाचे लक्ष लागलेल्या महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षपदावर अखेर पुन्हा बराक हुसेन ओबामा यांनी यशाची मोहोर उमटवली. ‘येस यू कॅन’ असे म्हणत 2008 मध्ये जनमानसाचा आत्मविश्वास चेताविणा:या ओबामा यांनी अध्यक्षपदावर विराजमान होताच ‘लूक फॉरवर्ड’चा नारा देत अमेरिकेच्या सुवर्णकाळाबाबत जनतेला आश्वस्त केले.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीचे भाकीत वर्तविताना जगभरातील भाष्यकारांनी बराक ओबामा व मिट रोम्नी या उमेदवारांच्या पारडय़ात 50-50 टक्के संधीचे दान टाकले होते. मात्र, सर्व अपेक्षा फोल ठरवित विजय मिळवला. विजयाचा कौल खुद्द ओबामा यांनीच टि¦टरवरून पोस्ट केल्यानंतर त्यांच्या समर्थकांसह जनतेने रस्त्यावर उतरत एकच जल्लोष सुरू केला. वॉशिंग्टन डीसी आणि शिकागोमध्ये रस्त्यारस्त्यावर लोकांनी वाद्ये, चित्तवेधी फटाके, राष्ट्रध्वज, बॅनर्स, फुगे आणि रंगविलेले चेहरे चमकवत आनंद साजरा केला.