खामामळ जमीन लीज आदेशाला आव्हान

कुडचडे। दि. 23 (प्रतिनिधी)

खामामळ— कुडचडे येथील सरकारी जमीन लीजवर देताना आवश्यक अटींची पूर्तता न केल्याबद्दल

कुडचडेचे माजी आमदार श्याम सातार्डेकर यांच्या पत्नी शिवांगी सातार्डेकर यांना दिलेली सुमारे दीड हजार चौ.मी. जमीन सरकारने ताब्यात घ्यावी या जिल्हाधिका:यांच्या आदेशाला सातार्डेकर यांनी

प्रशासकीय लवादासमोर आव्हान दिले आहे.

23 जानेवारीर्पयत सातार्डेकर यांनी ही जमीन खाली करावी अन्यथा दुस:या दिवसापासून केपे मामलेदारांनी या जमिनीचा ताबा घ्यावा, असे या आदेशात म्हटले होते.

या आदेशाला सातार्डेकर यांनी लवादासमोर आव्हान देऊन लवादाने या आदेशाला स्थगिती दिल्याने ही कारवाई थांबविल्याची माहिती केपेचे मामलेदार मनोज कोरगावकर यांनी दिली. या आव्हान अर्जावर 1 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

खामामळ येथील सुमारे दीड हजार चौ.मी. जमीन एप्रिल 2011 मध्ये शिवांगी सातार्डेकर यांना लीजवर देण्यात आली होती. ही जागा खनिज माल साठवून ठेवण्यासाठी वापरली जायची.

गोवा महसूल कायद्याच्या 26 कलमाप्रमाणे कुठलीही जागा कुणाला लीजवर द्यायची असेल तर सार्वजनिक पावणी करणे आवश्यक असून

अशी पावणी न करताच पाच वर्षासाठी ही जमीन लीज करण्याचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे अगरवाल यांनी आपल्या आदेशात म्हटले होते. या जागेसंदर्भात कुडचडेचे विद्यमान आमदार नीलेश काब्राल यांनी विधानसभेत आवाज उठविला होता.

सातार्डेकर हे आमदार असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीररित्या ही जमीन आपल्या पत्नीच्या नावे लीज करण्यास महसूल विभागाला भाग पाडले होते असा आरोप केला होता.

त्या वेळी महसूल खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी या प्रकरणात चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर या जागेसंदर्भात अगरवाल यांनी चौकशी सुरू केली होती.