गुणवत्ता महत्त्वाची- दीपिका

ऑनलाइन टीम

मुंबई, दि.१७ - कॉकटेल या चित्रपटात व्हेरॉनिकाची भूमिका उत्कृष्टपणे सादर करून दीपिकाने अभिनयातही आपली ओळख निर्माण केली आहे. कधी ग्लॅमरस तर कधी नॉन ग्लॅमरस अशा भूमिका साकारणार्‍या दीपिकाला या दोन्ही भूमिकांबद्दल लोकांचा असलेला वेगवेगळा दृष्टिकोन खटकतो. भूमिका कोणतीही असो, ती साकारण्यासाठी गुणवत्ता आवश्यक असते, प्रत्येक भूमिका महत्त्वाची असते, असे दीपिका मानते. ग्लॅमरस भूमिका साकारण्यासाठी गुणवत्तेची आवश्यकता नसते, असे काही लोक म्हणतात, त्याचे दीपिकाला वाईट वाटते. दीपिका म्हणते, 'कॉकटेलमधील माझी व्हेरॉनिकाची भूमिका सर्वांना आवडली. पण ही भूमिका ग्लॅमरस भूमिकाच होती. माझ्यासाठी ग्लॅमरपेक्षा चित्रपट आणि त्यातील भूमिका महत्त्वाची असते.'