चेन्नई एक्स्प्रेसमध्ये अजय

ऑनलाइन टीम

मुंबई, दि.१७ - सध्या अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्यातील वाद सर्वज्ञात आहे. सन ऑफ सरदार आणि जब तक है जान या दोन चित्रपटांच्या रिलीजवरून अजय आणि शाहरुखमध्ये जो अबोला झाला, तो पुन्हा कधीच मिटणार नाही, असे वाटत असतानाच अजय आता नरमल्याचे दिसते. कारण शाहरुखची मुख्य भूमिका असलेल्या चेन्नई एक्स्प्रेसमध्ये अजय एक लहानशी भूमिका करणार असल्याची बातमी आहे. अजयचा बेस्ट फ्रेंड रोहित शेट्टीच हा चित्रपट दिग्दर्शित करत असल्याने अजय या चित्रपटात काम करत असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात अजय एक खास आणि दमदार भूमिका करणार आहे. ही बातमी ऐकून इतरांना धक्का बसो ना बसो पण त्याचा मित्र आणि शाहरुखचा सर्वात मोठा शत्रू सलमान खानला धक्का बसणार आहे. या चित्रपटामुळे सलमान आणि अजयच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सलमानने शाहरुखविरुद्धच्या अजयच्या लढाईला साथ दिला होती; पण अजय आता शाहरुखसोबत काम करणार असल्याने सलमानची काय प्रतिक्रिया असेल, ते पुढे समजेलच.