जॉनसोबत नर्गिस

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १ - रॉकस्टारची अभिनेत्री नर्गिस फाखरी हिला बर्‍याच दिवसांनंतर एक चित्रपट मिळाला आहे. 'विकी डोनर' या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश करणारा जॉन अब्राहम त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या दुसर्‍या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. जाफना या चित्रपटाचा तो निर्माता आहेच, शिवाय तो मुख्य भूमिकाही साकारणार आहे. याच चित्रपटात नर्गिसही मुख्य भूमिकेत दिसेल. त्याचा हा चित्रपट हेरगिरीच्या रोमांचक कथेवर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटाची तुलना एक था टायगरशी केली जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुजित सरकार यांनी मात्र एक था टायगर आणि जाफनाची तुलना योग्य नसल्याचे म्हटले आहे. जाफना या चित्रपटाचे नाव आता बदलण्यात आले असून ते मद्रास कॅफे असे करण्यात आले आहे. या चित्रपटात नर्गिस फाखरी आणि जॉनची मुख्य भूमिका आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून दक्षिण भारतात काही दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत.