झी न्यूजच्या संपादकांना जामीन

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. १७ - काँग्रेसचे खासदार व उद्योजक नवीन जिंदाल यांच्याकडून १०० कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या झी न्यूजच्या दोन संपादकांना सोमवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यूज एडिटर सुधीर चौधरी व बिझिनेस एडिटर समीर अहलुवालिया या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती, तर झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र यांची पोलीसांनी चौकशी केली होती. जिंदाल स्टीलच्या विरोधी बातम्या न देण्यासाठी या दोघा संपादकांनी जिंदाल यांच्याकडे १०० कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार जिंदाल यांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून चौधरी व अहलुवालिया या दोघांना पोलीसांनी अटक केली होती. त्यांची चौकशी झाल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.

कोळसा खाण घोटाळाप्रकरणात जिंदाल स्टीलचा सहभाग असल्याच्या बातम्या आपल्याकडे असून १०० कोटी रुपये दिल्यास या बातम्या प्रक्षेपित न करण्याचे चौधरी व अहलुवालिया यांनी सांगतल्याचा आरोप आहे.