...तरीही तिला जगायचे होते

नवी दिल्ली। दि. २९ (लोकमत न्यूज नेटवर्क)

सामूहिक बलात्कारातील पीडित तरुणीच्या मनामध्ये या घटनेबाबत क्लेश होता. न्याय मिळवण्यासाठी तळमळ होती म्हणूनच तिला जगण्याची तीव्र इच्छा होती. घटनेनंतर १९ डिसेंबरला पहिल्यांदा तिचा भाऊ आणि आई यांनी तिची रुग्णालयात भेट घेतली.

तेव्हा मला जगायचंय एवढेच ती म्हणाली. न्यायदंडाधिकार्‍यांसमोर तिने दोनदा जबाब नोंदवला. सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान १0 दिवसांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या या विद्यार्थिनीने दाखविलेले धैर्य आणि भविष्याबाबतचे तिचे विचार याने मानसोपचार तज्ज्ञांनाही ती जगण्याची लढाई जिंकेल, अशी आशा होती. तिने २१ डिसेंबरला उप न्यायदंडाधिकार्‍यांसमोर आपला जबाबही नोंदवला.

यात तिने घटनेतील भीषणता आणि तीव्रता अधोरेखित केली. त्याच वेळी तिच्या समवेत असलेल्या मित्रानेही जबाब नोंदवला होता. परंतु, या जबाबाने वाद निर्माण झाल्यानंतर तिने पुन्हा एकदा घटना विशद करत

आपला जबाब दिला. त्यात यातील दोषींना कठोर शिक्षा करून

आपल्याला न्याय द्यावा, असे तिने म्हटले होते.