दिवाळी पहाट फुलली

- अभ्यंगस्नानानंतर डोंबिवलीतील फडके रोड भेटीगाठीने बहरला

- ठाण्याच्या राम मारुती रोडवरही तरुणाईचा जल्लोष कायम

- सकाळी ७ वाजल्यापासून राम मारूती रोड तसेच मासुंदा तलाव परिसरात तरुणाईची गर्दी जमायला सुरूवात झाली होती. मित्रमंडळींना शुभेच्छा देण्यासह काही सुखद क्षणांना कॅमेर्‍यात बंदिस्त करण्याच्या उद्देशाने अनेकजण ग्रुप फोटो काढत होते. त्याचबरोबर मासुंदा तलाव परिसरातील रस्त्यावर मोठया प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. यंदा विशेष म्हणजे तरूणाईसह काही चिमुरडीही आवर्जून हे सेलिब्रेशनात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते.

- डोंबिवलीत पहाटे ५.३0 वाजल्यासपासून गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांग लावली होती.

- ठाणे-डोंबिवलीचे पहाटेपासून सुरू झालेले हे जंगी सेलिब्रेशन दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होते. मात्र तरीही तरुणांच्या उत्साहात किंचितही कमी झाला नव्हता. दिवाळीच्या पहिल्या दिवशी होणारी गर्दी म्हणजे जणू एक स्नेहसंमेलनच रंगले होते.

- डोंबिवलीतील गणेश मंदिर हे डोंबिवली शहराचे ग्रामदैवत असल्याने गणेशाचे दर्शन घेऊन दिवाळीच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देण्याची पद्धत डोंबिवलीत गेल्या अनेक वर्षांपासून रूढ झाली. तिला ५0 वर्षे लोटली आहेत.

- बाजीप्रभू चौक ते आप्पा दातार चौक या दरम्यान फडके रोड हा प्रचंड गर्दीने तुडुंब भरून ओसंड वाहत होता. रस्त्याच्या मधोमध भव्य-दिव्या रांगोळी काढण्यात आली होती.

- या सोहळयाच्या निमित्ताने डोंबिवलीत जल्लोष २0१२ या कार्यक्रमात डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसली.

वसतिगृहातील

मुलांसोबत दिवाळी

चिकणघर - ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाने मामणोली येथील हिंदू सेवा संघाच्या वस्तीगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांना फराळ वाटप करून दिवाळी साजरी केली. यावेळी संघाच्या पदाधिकार्‍यांनी कविता वाचन करून मनोरंजन केले. वाडा, जव्हार, विक्रमगड, शहापूर, मोखाडा आदी आदिवासी भागातील गरीब विद्यार्थी शिकण्यासाठी आलेले विद्यार्थी येथील वस्तीगृहात आहेत. प्रा. उदय सामंत, अरुण भगत आदी उपस्थित होते.

बालदिवसाचे आयोजन

भाईंदर - खा. डॉ. संजीव नाईक यांच्या प्रयत्नाने भाईंदर येथील मॅक्सेस बॅक्वीट हॉलमध्ये उद्या स. १0.३0 वा. पासुन महापौर कॅटलिन परेरा, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत चाईल्ड हेल्प फाऊंडेशनमार्फत बालदिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी काही आश्रमातील ५0 मुले उद्याच्या बालदिनी उपस्थितांचे विविध कार्यक्रमांतर्गत मनोरंजन करणार असुन हा बालदिन शहरात प्रथमच होत असल्याचा दावा आयोजकांकडुन करण्यात आला आहे.