दोन लाख रुपयांची रोकड लंपास

नाशिक। दि. २ (प्रतिनिधी)

मोटारसायकलच्या डिक्कीतून तब्बल २७ तोळे सोने लंपास केल्याची घटना ताजी असताना, आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमजीरोड येथून एका चारचाकीमधून दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे वृत्त असे की, इंदिरानगर गीतांजली कॉलनी येथील रहिवासी गणेश दत्तात्रय ऋषिपाठक हे त्यांच्या चारचाकी गाडीने खासगी कामानिमित्त एमजीरोड भागात गेले होते. त्यांनी सांगली बॅँक कॉर्नरला गाडी पार्क करून काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडले. मात्र दोन लाखाची रोकड त्यांनी गाडीच्या मागच्या सीटवर विनासुरक्षित ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी गाडीची काच तोडून ही रोकड लंपास केली.