‘पाडवा पहाट’चे आयोजन

मालेगाव- येथील एकता सांस्कृतिक मंचतर्फे दीपावलीनिमित्त येत्या बुधवारी ‘पाडवा पहाट’ या आनंदमयी मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सारेगमप लिटील चॅम्प स्पर्धेतील महागायक शुभम खंडाळकर, ‘गौरव महाराष्ट्राचा’ या स्पर्धेतील विजेता गायक सुरंजन खंडाळकर आणि भजन सम्राट रघुनाथ खंडाळकर, पुणे यांच्या विविधरंगी गायनाची मैफल रंगणार आहे.