पिंकी पुरुषच!

बलात्काराचा गुन्हा दाखल

बरासात(प. बंगाल)।

दि. १२ (वृत्तसंस्था)

आशियन क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती अँथलेटिक पिंकी प्रामाणिक हिच्या लिंगाबद्दल वाद सुरू असताना वैद्यकीय चाचणीत ती पुरुष असल्याचे आज सिद्ध झाले. त्यावरून पोलिसांनी पिंकीविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा आरोप लावला आहे.

कोलकाता येथील एसएसकेएम हॉस्पिटलमधील चाचणीत पिंकी पुरुष असल्याचे सिद्ध झाले. चाचणीचा अहवाल आज कोर्टात सादर केल्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध हे आरोप लावले. पिंकी तिची मैत्रीण अनामिका आचार्यसोबत राहत होती. पिंकी ही पुरुष असून, तिने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप अनामिकाने लावल्यानंतर पोलिसांनी १४ जून रोजी पिंकीला अटक केली होती.