पेट्रोल- डिझेलच्या दरांत वाढ

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. १- देशातील जनता महागाईने त्रस्त झालेली असतानाच नवीन वर्षातही त्यांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने केलेल्या घोषणेनुसार पेट्रोलच्या किमतीत प्रतिलीटर ७९ पैशांनी तर डिझेलच्या किमतीत प्रतिलीटर ५१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. मंगळवार मध्यरात्रीपासून हे नवे दर लागून होणार असून देशात सर्वत्र एकाचवेळी ही दरवाढ लागू होणार आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर आता ७४.३२ रुपये तर डिझेलचा दर ५३.१४ रुपये इतका झाला आहे. नवीन वर्षातच उपनगरीय रेल्वेचे भाडे वाढल्याने मुंबईकरांचे नवीन वर्षाची सुरूवात एकूणच महागाईने झाल्याचे दिसत आहे.