प्रकाश, राम मुख्य फेरीसाठी पात्र

चेन्नई । दि. ३१ (वृत्तसंस्था)

प्रकाश अमृतराज व राजीय रामने अनुक्रमे ब्रिटनच्या के. जेम्स वॉर्ड व फ्रान्सचा कॅनी डी शेपरचा पराभव करीत एटीपी चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीतील आपली जागा निश्‍चित केली. दुसरीकडे भारताच्या युकी भांबरीला सहाव्या मानांकित हॉलंडच्या रॉबिन हासकडून पराभव पत्करावा लागला.

पुरूषांच्या एकेरीत भारताचे माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांचे चिरंजीव प्रकाश अमृतराज याने आपल्या अखेरच्या पात्रता फेरीत वॉर्डचला २ तास २३ मिनिट चालेल्या लढतीत ५-७, ६-४, ६-४ असे पराभव केला. पहिला सेट गमाविल्यानंतर प्रकाशने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

पुरूषांच्या दुसर्‍या लढतीत विश्‍व क्रमवारीत २१७ व्या क्रमांकावर असलेल्या युकी भांबरीला पहिल्या लढतीत रॉबिनकडून हासकडून सरळ दोन सेटमध्ये ५-७, ३-६ असा पराभव स्वीकारावा लागला.

तिसर्‍या लढतीत अमेरिकेत जन्मलेल्या भारताच्या राजीव रामने फ्रान्सच्या कॅनी डी शेपरला २ तास २२ मिनिटे खेळल्या गेलेल्या लढतीत ७-६ (७), ४-६, ६-१ असे नमवित एकेरीच्या मुख्य फेरीत

प्रवेश केला.

उद्या प्रकाश अमृतराज आपल्या पहिल्या फेरीत फ्रान्सच्या रूफिन गुइलाम विरूद्ध तर राजीव राम इस्त्राईलच्या डउडी सेला

विरुद्ध खेळतील.