बोरिवलीत आसाराम बापूंचा सत्संग

मुंबई। दि. २९ (प्रतिनिधी)

आजच्या पाश्‍चात्त्य अंधानुकरणाच्या युगात मुले व तरुणांवर संस्कार सिंचन करण्यासाठी संत आसाराम बापूंच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या मातृ-पितृ पूजन दिनासंदर्भात उद्या रविवारी बोरिवली येथे चिकूवाडीतील महापालिका मैदानात प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

संत श्री आसाराम बापूंच्या सत्संग कार्यक्रमाचे ३0 डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेऐवजी मातृ-पितृ पूजन दिन साजरा करून त्या दिवशी आई-वडिलांचे पूजन करून गणपतीसारखे मातृ-पितृभक्त होण्याचा सल्ला तरुणांना दिला जातो.