ब्रिटनमध्ये ३३ लाख भ्रूणांची हत्या!

लंडन। दि. ३१ (वृत्तसंस्था)

‘इन-व्हिट्रो-फर्टिलायजेशन’ (आयव्हीएफ) या तंत्रज्ञानाने कृत्रिम गर्भधारणा करून ब्रिटनमध्ये गेल्या २0 वर्षांत सुमारे दोन लाख मुले जन्माला घालण्यात आली. पण त्यासाठी प्रयोगशाळेत ३५ लाखांहून अधिक मानवी भ्रुण तयार केले गेले गेले व त्यापैकी ३३ लाख भ्रुण इच्छित उद्देशासाठी न वापरताच फेकून दिले गेले, अशी धक्कादायक सरकारी ाकडेवारी समोर आली आहे. या तंत्राने जन्माला येणारे मूल ‘टेस्ट ट्युब बेबी’ म्हणून ओळखले जाते.

ही धक्कादायक आकडेवारी असे सांगते की, एका महिलेची ‘आयव्हीएफ’ तंत्राने कृत्रिम गर्भधारणा करण्यासाठी सरकारी १५ भ्रुण प्रयोगशाळेत तयार केले जातात आणि त्यापैकी सुमारे निम्मे भ्रुण ही प्रक्रिया सुरु असताना अथवा पूर्ण झाल्यावर फेकून दिले जातात. यासंबंधीच्या अधिकृत आकडेवारीचे संकलन २१ वर्षांपूर्वी सुरु केले गेल्यापासून नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होऊ न शकणार्‍या महिलांना गरोदर राहण्यास मदत करण्याच्या उद्देशाने प्रयोगशाळेत तयार केल्या गेलेल्या एकूण मानवी भ्रुणांपैकी १७ लाखांहून अधिक भ्रुण केराच्या टोपलीत फेकण्यात आल्याचे वृत्त ‘डेली मेल’ या वृत्तपत्राने दिले आहे. कृत्रिम गर्भधारणा उद्योगाचे नियमन करण्यासाठी ब्रिटनमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘ह्युमन फर्टिलायजेशन अँण्ड एम्ब्रायोलॉजी अँथॉरिटी’(एचएफईए) या नियामक संस्थेने ही आकडेवारी संकलित केली आहे. ‘आयव्हीएफ’ तंत्राने गर्भधारणा करण्यासाठी स्त्रीबिज आणि

पुरुषाचे शुक्राणु यांचा प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या संयोग घडवून भ्रुण तयार केले जातात.

यापैकी काही भ्रुण नंतर जिची गर्भधारणा करायची असेल त्या महिलेच्या गर्भाशयात सोडले

जातात. शिल्लक राहणार्‍या तयार भ्रुणांपैकी काही साठवून ठेवले जातात, काही उपयोग करायचा नसल्याने फेकून दिले जातात तर काही वेळा काही भ्रुण वैज्ञानिक प्रयोगांसाठी वापरल जातात, असेही या वृत्तात म्हटले आहे.

ब्रिटनचे आरोग्यमंत्री लॉर्ड होव्ह यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार १९९१ पासून ब्रिटनमध्ये १९९१ पासून ३५ लाख ४६ हजार ८१८ मानवी भ्रुण कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत तयार केले गेले. त्यापैकी फक्त दोन लाख ३५ हजार ४८0 भ्रुणांचा भावी मातांच्या गर्भाशयांत प्राथमिक गर्भधारणेसाठी यशस्वीपणे उपयोग होऊ शकला. परिणामी प्रयोगशाळेत तयार केलेल्या एकूण मानवी भ्रुणांपैकी तब्बल ९३ टक्के म्हणजे ३३ लाखांहून अधिक भ्रुणांचा प्रत्यक्ष गर्भधारणेसाठी कधीही उपयोग केला गेला नाही.

एकूण भ्रुणांपैकी आठ लाख ३९ हजार ३२५ भ्रुण भविष्यात वापर करण्यासाठी साठवून ठेवले गेले तर २,0७१ भ्रुण इतरांना दान करण्यासाठी साठवून ठेवले गेले. आणखी ५,८७६ भ्रुण वैज्ञानिक प्रयोगांसाठी बाजूला ठेवले गेले. गर्भधारणा होईल या आशेने प्रयोगशाळेत तयार केलेले एकूण १३ लाख ८८ हजार ४४३ भ्रुणाचे इच्छुक महिलांच्या गर्भाशयांमध्ये रोपण केले गेले व त्यापैकी जेमतेम सहामधील एका म्हणजे १६ टक्के भ्रुणांनी यशस्वी गर्भधारणा होऊ शकली.