भारतीय नागरिकाची अमेरिकेत हत्या

ऑनलाइन टीम

वॉशिंग्टन, दि. १- अमेरिकेतील ओहियो येथे सुपरमार्केट चालवणा-या भारतीय नागरिकाची अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गोली वेंकट रेड्डी (वय ४८) असे मृत इसमाचे नाव असून ते मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत. त्यांचे ओहियो येथे सुपरमार्केट स्टोअर होते.

रेड्डी यांची पत्नी कविता यांना रेड्डींचा मृतदेह दुकानात सापडला. त्यांनी तातडीने फोन करून पोलिसांना बोलावल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत असून आत्तापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.