मुन्नी पुन्हा बदनाम होणार..

ऑनलाइन टीम

मुंबई, दि.१७ - दबंग-२ मध्ये फेविकॉल से हे गाणे पाहिल्यानंतर या चित्रपटात बदनाम मुन्नीचे ठुमके पाहायला मिळतील की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता; पण आता या सस्पेंसवरून पडदा उठला असून या चित्रपटात मुन्नी पुन्हा एकदा बदनाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच दबंग-२ मधील मुन्नीचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला. या चित्रपटाची निर्माती असलेली मलाईका अरोरा खान पुन्हा एकदा एक धम्माल आयटम साँग करणार आहे. त्यामुळे आता करिनाच्या फेविकॉलसह मुन्नीही धम्माल करेल यात शंका नाही. सलमानची दबंगगिरी, करिनाचा फेविकॉल आणि मलाईकाच्या मुन्नीमुळे दबंग-२ सगळे रेकॉर्डस मोडेल यात शंका नाही.