म्हणे, सहाशे रुपयांत घर चालते!

नवी दिल्ली। दि.१६ (लोकमत न्यूज नेटवर्क)

पाच जणांच्या कुटुंबासाठी महिन्याला ६00 रुपये पुरेसे आहेत, असा दावा करणार्‍या दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे वक्तव्य गरिबांचा अपमान करणारे असल्याचे टीकास्त्र भाजपाने सोडले आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या माफीची मागणीही भाजपाने केली आहे.

राजधानीतील दोन लाख गरीब कुटुंबांतील वयाने सर्वात ज्येष्ठ असलेल्या महिला सदस्याच्या बँक खात्यात दरमहा रोख ६00 रुपये अनुदान थेट जमा करण्याच्या दिल्ली सरकारच्या ‘अन्नश्री’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या शुभारंभानंतर दीक्षित यांनी हे वक्तव्य केले होते. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी दीक्षित यांच्यावर टीका केली.

---------------

शीला दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार, सहाशे रुपयांत तुमचे भागते का?

सहाशे रुपयांत तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो का? सध्या घर व्यवस्थित चालवायचे असेल तर महिना किती रक्कम हवी? आजच्या जमान्यात काटकसरीत कसा संसार करावा? आम्हाला गुरुवारपर्यंत कळवा. पत्रावर ‘आमचे बजेट’ लिहायला विसरू नका. निवडक पत्र आम्ही प्रसिद्ध करू.

आमचा पत्ता : लोकमत, १८९/ ए, दुसरा मजला, आनंद कॉम्प्लेक्स,

साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी (प.), मुंबई ११ फॅक्स नं. 0२२-२३00८८६0