‘लेक वाचवा’ निबंध स्पध्रेचे बक्षीस वितरण

हिंगोली। दि.16(जिल्हा प्रतिनिधी)

जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने ‘लेक वाचवा’ अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पध्रेचे रविवारी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

या स्पध्रेत 2 हजार 38क् स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. खुल्या गटातून 4 व माध्यमिक गटातून 4 विजेते यावेळी निवडण्यात आले. माध्यमिक गटातून o्रद्धा हलगे(प्रथम), केतकी जोशी (द्वितीय), रामेश्वर सरकटे (तृतीय), शुभदा शिंदे (प्रोत्साहनपर) तर खुल्या गटातून पंढरीनाथ वायभासे (प्रथम), स्वाती मांडवगडे (द्वितीय), संतोष पोले (तृतीय), एम.एस.गुंडेकर (प्रोत्साहनपर) यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. शिवाजी माने, राजू गोडसे, आ.भाऊराव पाटील, जि.प.उपाध्यक्ष मिलिंद यंबल, विलास गोरे यांची उपस्थिती होती.

परीक्षक प्रा. मदन मार्डीकर, आरती मार्डीकर, डॉ. दीपाली टेहरे, वंदना सोवितकर, हजारे, राजू देव यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.