शेअर बाजार उसळून कोसळला

मुंबई : सुरुवातीच्या १५0 अंकांची उसळी घेतल्यानंतर शेअर बाजार पुन्हा कोसळला. मात्र दिवसभराच्या चढ-उतारानंतर सेन्सेक्स १२ अंकांनी वाढला. इन्फोसिस आणि विप्रो या आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये उठाव आल्यामुळे काही प्रमाणात सावरला. गेले दोन दिवस सेन्सेक्स कोसळतच होता. आज सकाळी बाजार चढला. थोड्याच वेळात त्याने उसळी घेतली.
एका क्षणी सेन्सेक्स १९,५८५.७५ अंकांवर पोहोचला. मात्र, रुपयाची मोठी घसरण झाल्यानंतर सेन्सेक्सही पुन्हा उताराला लागला. ही घसरण आयटी कंपन्यांनी काही प्रमाणात रोखली. दिवसअखेरीस ११.८४ अंकांची वाढ नोंदवित सेन्सेक्स १९,४४१.0७ अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी ३ अंकांनी घसरला. ५,८७८.00
अंकांवर निफ्टी बंद झाला. एमसीएक्स-एसएक्स ३.९९ अंकांनी वाढून ११,५३२.६९ अंकांवर बंद झाला. (प्रतिनिधी)