‘सखी’च्या कव्हरवर ‘तुमचा’ फोटो

सखीच्या ‘मुखपृष्ठा’वर समजा तुमचाच फोटो झळकला तर.? काय म्हणता विश्‍वास नाही बसत.? सखीच्या मुखपृष्ठावर फोटो छापून यायला आपण कुठे ‘मॉडेल’ आहोत?

- असं वाटणं साहजिक आहे, पण विश्‍वास ठेवा. सखीच्या मुखपृष्ठावर तुमचाही फोटो झळकू शकतो. त्यासाठी तुमचा प्रसन्न-हसरा असा छानसा फोटो फक्त तुम्ही आम्हाला सखीच्या पत्त्यावर पाठवायचा. आणि वाट पाहायची तो फोटो छापून येऊन आपण महाराष्ट्रासह-गोव्यातही फेमस होण्याची.!

त्यासाठी तुम्ही एवढंच करायचं.

१) तुमचा एक छान-प्रसन्न-प्रोफेशनली शूट केलेला फोटो सखीला पाठवायचा.

२) फोटोची प्रिंट पाठवणार असाल तर ती ८ बाय १२ या साईजमध्येच असावी.

३) फोटो ईमेल करणार असाल तर ६ मेगापिक्सेल (म्हणजेच २८१६ x २११२ पिक्सल) याच साईजमध्ये तो असायला हवा.

मात्र हे लक्षात ठेवा :

१) मोबाईलवरून काढलेले फोटो स्वीकारले जाणार नाहीत.

२) प्रसिद्ध केलेले अथवा न केलेले फोटो परत पाठवले जाणार नाहीत.

३) फोटो निवडीचा अंतिम अधिकार संपादक मंडळाचा असेल, त्याबाबत फोनवरून कसलीही चौकशी-आग्रह-विनंती करू नये.

पत्ता :

संयोजक, सखी, पुरवणी विभाग, ‘लोकमत भवन’,

बी-३, एमआयडीसी, अंबड. नाशिक - ४२२ 0१0.

ईमेल : lokmatsakhi@gmail.com