‘सन ऑफ सरदार’ नव्हे फक्त हाहाकार

हिंदी चित्रपट परीक्षण

- अनुज अलंकार

कॉमेडी चित्रपट तयार करण्यासाठी मजबूत स्टोरी लाइनची गरज नसते या विधानावर थोडीबहूत चर्चा होऊ शकते. मात्र अजय देवगण आणि त्यांचा चित्रपट सन ऑफ सरदारच्या टीमच्या मते कॉमेडी चितरपटासाठी कोणत्याही प्रकारच्या स्टोरी लाइनची गरज नाही असे

वाटत आहे. फक्त विनोदांची जोडाजोड करून चित्रपट तयार करता येतो अशी त्यांची धारणा झालेली असावी. आपल्या या विचारधारणेमुळे अजयच्या टीमने एका अशा चित्रपटाची निर्मिती केली आहे ज्यात कॉमेडी मसाल्याच्या नावावर फक्त फुसका बार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना हास्याऐवजी हिणवण्याची जाणीव जास्त होते.

सन ऑफ सरदारच्या टायटलवरूनचा कळते की चित्रपट पंजाब आणि सरदारजी लोकांवर तयार करण्यात आलेला आहे. चित्रपट लंडनपासून सुरू होतो. तिथे राजवीर रंधावा (अजय देवगण)हा मस्त मजेत राहत असतो. पंजाबमध्ये आपल्या नावावर काही जमिन आहे याची त्याला माहिती पडते. तसेच संधू (संजय दत्त) सोबत त्याच्या कुटूंबाचे वैर आहे, तसेच या वैरामध्ये दोन्ही कुंटूंबातील अनेक माणसे मारली गेली आहेत. रंधावाच्या वडीलांनी संधूच्या काकांना ठार मारलेले असते. तर संधूच्या काकांनी राजवीरच्या वडीलांना जीवे मारलेले असते. संधू आपल्या भावांसोबत राजवीरच्या परतण्याची वाट पाहत असतो, कारण संधूला रणवीरला मारून आपल्या काकांच्या मुत्यूचा सूड घ्यायचा असतो. ट्रेनमध्ये संधूची पुतणी जियाची (सोनाक्षी सिन्हा) भेट राजवीरसोबत होते. तिथे राजवीर जियाच्या प्रेमात पडतो. योगायोगाने राजवीर संधूच्याच घरात पाहूणा म्हणून येतो. तेव्हा सगळ्य़ांना कळते की हाच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. मात्र पिढय़ानपिढय़ा चालत आलेल्या परंपरेनुसार आणि संस्कारांमुळे संधूच्या भावडांना राजवीरला स्वत:च्या घरात मारायचे नसते. तेव्हा ते त्याच्या घरातून बाहेर पडण्याच्या प्रतिक्षेत असतात. राजवीर घरातून बाहेर निघतो तेव्हा वैर आणखी वाढते. दोन्ही बाजूने मारहाण होते. मात्र शेवटी कौटूंबिक वैर विसरून संधू त्याच्या पुतणीचा हात राजवीरच्या हाती देतो.

चित्रपटातील उणिवा - अजय देवगण आणि चित्रपटाचे दिग्दर्शन केलेल्या अश्‍विनी धीर यांनी चित्रपटासाठी कोणतीच पटकथा निवडलेली नाही. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपट र्मयादा रमन्नाचा रिमेक

तयार केलेला आहे. आश्‍चर्याची

बाब म्हणजे र्मयादा तमन्ना स्वत:

एका इंग्रजी चित्रपटाचा रिमेक

आहे. रिमेक करणे म्हणजे वाईट गोष्ट नाही. मात्र अश्‍विनी धीर जे स्वत: एक लेखक आहेत, त्यांनी स्वत: असा स्क्रीन प्ले लिहीलेला आहे, ज्यामुळे चित्रपटाचे तीन तेरा वाजलेले आहेत. धीर यांच्या पटकथेचा सर्वात कमकुवत पणा म्हणजे चित्रपटाची पटकथा खूप लहान असून ती डेव्हलप करण्यात आलेली नाही. व्यवस्थित डेव्हलप न करता चित्रपटाची पटकथा जबरदस्ती ताणण्यात आलेली

आहे. एका घरात घुसलेल्या माणसाला बाहेर काढण्याची धडपड असणारा सिक्वेन्स चांगला होता. मात्र या सिक्वेन्सच्या आधारावर चित्रपटाचा डौलारा उभा करता येणार नाही, तसेच यानंतर चित्रपटात पाहण्याजोगे काहीच शिल्लक राहत नाही.

चित्रपट अवघी दहा मिनिटे पाहीला असता संपूर्ण चित्रपट माहित पडतो. अश्‍विनी धीर यांनी याआधीही दोन चित्रपट तयार केलेले आहेत, मात्र हा चित्रपट पाहिला असता असे वाटते की चित्रपट दिग्दर्शनातले त्यांना काहीच येत नाही. खासकरून त्यांना कॉमेडीची काहीच जाणीव नाही आहे. धीर यांनी याआधी टिव्ही शोजचे लेखन केलेले असून त्यांच्यासाठी तेच उत्तम वाटते. चित्रपटात लेखन आणि दिग्दर्शन करणे धीर यांच्या आवाक्याबाहेरील आहे. धीर या चित्रपटात पूर्णपणे फ्लॉप आहे.

चित्रपटाची वैशिष्ट्ये -

अजय देवगण म्हणजेच अँक्शन हे चित्रपटाचे प्रमुख आकर्षण असणार आणि ते अजय उत्तमरित्या निभावणार यात शंकाच नाही. त्याचा सामना करण्यात वाढलेल्या वयाचा संजय दत्त कमी पडताना दिसत नाही. सोनाक्षी चित्रपटात सुंदर दिसते. मात्र फक्त ग्लॅमरस डॉल म्हणूनच. याव्यतिरिक्त तिला चित्रपटात काहीही करण्यासारखे नाही. चित्रपटाचे संगीत उत्तम आहे. राजा राणी सोबतच टायटल साँगपर्यंतची सर्वच गाणी पडद्यावर पहायला आमि ऐकायला छान वाटतात.

का पाहावा? कॉमेडीच्या नावावर असलेल्या फुसक्या बारमुळे निराशा वाटेल.

का पाहू नये ?

जर कॉमेडीच्या नावावर काहीही पाहण्याची हौस असेल तर.

एकूण मिळून सम ऑफ सरदारमध्ये कॉमेडी कमी आणि हाहाकार जास्त आहे, ज्यामुळे हसू कमी येते. चित्रपट निराश करतो.