सात महिन्यांत अपघातात ३५६ बळी

मुंबई । दि. ३१ (प्रतिनिधी)

मुंबईकरांनो दारू पिऊन गाडी चालवत असाल तर जरा जपूनच. कारण गेल्या सात महिन्यांत मुंबई शहर आणि उपनगरात तब्बल १८,५२३ अपघातांची नोंद झाली आहे. यात ३५६ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ३,४१२ जण जखमी झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी चेतन कोठारी यांना माहितीच्या अधिकारांतर्गत दिली आहे.

वाहतूक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबई शहर आणि उपनगरमध्ये वर्ष २0१0, २0११ आणि २0१२ मध्ये केवळ वाहकांच्या चुकीमुळे झालेल्या ६0,६६५ अपघातांत १४८५ जणांचा मृत्यू झाला तर २१२,९६६ जण जखमी झाले आहेत. ड्रंक अँण्ड ड्राईव्ह प्रकरणात २९ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर १00 जण जखमी झाले आहेत.

मुंबईतील या अपघातांमध्ये जागीच मृत झालेल्यांची संख्या १,४५४ आहे. यात वाहन बेदरकारपणे चालविणे, दारू पिऊन गाडी चालविणे अशा विविध कारणांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे एकही अपघात

झाला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वर्षे २0१0 २0११ २0१२

मृत्यू ६३७ ५३९ ३५६

जखमी ५0६५ ५0५९ ३४१२

अपघात २८४२४ २५४७१ १८५२३