अहमदनगर

ताज्या बातम्या

 • बाभळेश्‍वर : आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा भागवत ग्रंथातूनच मिळते. सर्व वेदांचे सार भागवत कथा असून पुराणात या ग्रंथाला सर्वश्रेष्ठ स्थान आहे. म्हणूनच भागवत कथा श्रवण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सराला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केले.

 • २६४ उदभव कोरडेठाक लोकमत - १८ तास पूर्वी

  संगमनेर : उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढू लागताच तालुक्यात पाणी टंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. २८६ पैकी २६४ उद्भव कोरडेठाक पडले असून, २२ साठय़ांमध्ये केवळ २ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत.

 • वसुलीचे नियोजन कोलमडले लोकमत - १८ तास पूर्वी

  अहमदनगर: मालमत्ता कर वसुलीचे नियोजन यंदा आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच कोलमडले आहे. चालू वर्षाची ३७ आणि मागील थकबाकी १0२ असे १३९ कोटी वसुलीचे उद्दिष्ट महापालिकेसमोर असणार आहे. एप्रिलअखेरपर्यंत आगाऊ संकलित कर भरला तर महापालिकेकडून दहा टक्के सूट दिली जाते पण मालमत्ता कराची बिलेच अजून मालमत्ताधारकांपर्यंत पोहचलेली नाहीत.

 • अशोक निंबाळकर, अहमदनगररोहयो मजुरांचा सरकारच्या डोक्यावर सव्वा कोटी रूपयांचा बोजा झाला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा पगार वेळेत न केल्याने राज्य सरकारला ही भरपाई द्यावी लागेल. जानेवारीसाठी ६६ लाख २0५ तर फेब्रुवारीसाठी ६४ लाख ४८ हजार ८0९ रूपये केवळ व्याजापोटी रक्कम झाली आहे. मार्च आणि एप्रिलच्या पगारालाही विलंब झाल्याने व्याज भरावे लागेल.

 • पाण्यावरुन राजकीय कलगीतुरा लोकमत - १८ तास पूर्वी

  अहमदनगर: मुळा धरणातून सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यावरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच पेटण्याची चिन्हे आहेत. भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे आमदार शंकरराव गडाख यांच्यावर इफेक्टवान गडी कधी झाला, अशा शब्दात टीका केली आहे. तर माझी धमक काढणार्‍यांनी पाण्यासाठी आपण पूर्वी काय केले हे तपासावे. पाण्यात राजकारण आणू नये, असे उत्तर गडाख यांनी कर्डिले यांना प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिले आहे. यामुळे आवर्तनाचे श्रेय लाटण्यावरून दोन्ही आमदारांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

 • अहमदनगर : जामखेड तालुक्यातील गोयकरवाडी येथील खडीक्रशर बंद करण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली. या प्रकरणी वस्तुस्थिती पाहून कारवाई करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिले.

 • पारनेर(जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीतील कार्यालयात दूरध्वनी करून धमकी देणार्‍याला अटक करण्याचे आदेश पारनेर न्यायालयाने मंगळवारी दुपारी दिले आहेत. आदेशानंतर पारनेर पोलिसांचे पथक उस्मानाबादला रवाना झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 • अहमदनगर : जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात पेटलेल्या १६ साखर कारखान्यांपैकी प्रवरा आणि अशोक वगळता अन्य कारखान्यांचे बॉयलर थंडावले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत खासगी आणि सहकारी साखर कारखाने मिळून ८२ लाख १४ हजार ४२४ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यातून ८९ लाख ३८ हजार ६७0 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा साखर उतारा १0.७१ च्या जवळपास निघाला आहे.

 • राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडल्यानंतर आता आजपासून डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, उजव्या कालव्यातून पिण्यासाठी सोडलेल्या आवर्तनात वाढ करून ते शेतीसाठी वापरण्यात येणार आहे.

 • कर्मचार्‍यांचे पगार रखडले लोकमत - १८ तास पूर्वी

  अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या सुमारे १५ हजारहून अधिक कर्मचार्‍यांचा एक महिन्याचा पगार रखडलेला आहे. या प्रश्नी मंगळवारी कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आहे. दरम्यान, नवाल यांनी दोन दिवसात कर्मचार्‍यांचे पगार अदा करण्याचे आदेश अर्थ विभागाला दिले आहेत.

 • अहमदनगर : कोणत्याही कार्यक्रमावर वीज गेल्याने विरजण पडणे, चार-चार दिवस गाव अंधारात असणे यात काही नावीन्य राहिलेले नाही. परंतु ज्या नियोजन भवनातून जिल्ह्यातील जनतेच्या भवितव्याचे नियोजन चालते ते दिवसाही अंधारात बुडून जाते. याची प्रचिती दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनाच मंगळवारी आली!

 • वकिलाचा सबजेलमध्ये मृत्यू लोकमत - १८ तास पूर्वी

  अहमदनगर : एका फसवणुकीच्या गुन्ह्यात उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले अँड. तुळशीराम कोंडिबा ऊर्फ टी. के. बालवे (वय ६0 रा. नगर) यांचा मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 • प्रचाराच्या तोफा आज थंडावणार लोकमत - मंगळ, २२ एप्रिल २०१४

  निवडणुकीचा दिवस दोन दिवसावर येऊन ठेपल्याने निवडणुकीचा प्रचार उद्या रंगात येणार आहे. आज दिवसभरही प्रत्येक पक्षाच्या उमेदवार, कार्यकर्त्यांनी आजचा दिवस चांगलाच कारणी लावला.

 • मिशन पाणीटंचाई निवारण लोकमत - मंगळ, २२ एप्रिल २०१४

  अहमदनगर : लोकसभा निवडणुकीतून उसंत मिळत नाही तोच प्रशासनाने पाणी, पाणीटंचाई निवारण, गारपिटीची मदत पोहोचविण्यासाठी मोर्चा वळविला आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी कर्मचारी व अधिकार्‍यांना तशा सूचना दिल्या आहेत. स्वत: तेही रखडलेल्या कामांबाबत आढावा बैठका घेत आहेत.

आणखी ताज्या बातम्या »