अकोला

ताज्या बातम्या

 • नवीन ग्राहकाच्या नळ जोडण्यांची प्रकरणे मंजूर करण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभाग कारंजाच्या दोन कर्मचार्‍यांना एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची घटना आज २३ एप्रिल रोजी दुपारी १२.३0 वाजताच्या दरम्यान घडली.

 • जिल्हय़ात यंदा खरिपाच्या पेरण्याकरिता कृषी विभागाने विविध पिकांच्या एक लाख १३ हजार ७३६ क्विंटल बियाण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

 • रावेर लोकसभा मतदार संघासाठी उद्या २४ एप्रिल रोजी निवडणूक होत असून या मतदार संघात समाविष्ट करण्यात आलेल्या नांदुरा तालुक्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

 • 'जीना मरना तेरे साथ' अशी शपथ घेऊन घरून पलायन करणार्‍या मजनूला पोलिस कोठडीची हवा खावी लागत असून, मुलगी घरातील मंडळीच्या ताब्यात देण्यात आली आहे.

 • जुने शहरातील महिलेवर बलात्कार लोकमत - १७ तास पूर्वी

  जुने शहरातील डाबकी रोडवर राहणार्‍या एका २४ वर्षीय महिलेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या युवकाविरुद्ध जुने शहर पोलिसांनी बुधवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

 • विमानतळ विस्तारीकरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जमीन हस्तांतरीत करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 'जैसे थे'चा आदेश बुधवारी दिला.

 • सातत्याने जलवाहिन्यांना लागणारी गळती व वारंवार विस्कळीत होणार्‍या पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात बुधवारी अधिकच भर पडली.

 • अमडापूर (बुलडाणा): नातेवाईकांच्या येथील लग्नावरून घराकडे परतत असलेल्या एका महिलेच्या अंगावरील दागिण्यांसह तिच्या पुतण्याची मोटार सायकल अज्ञात ७-८ लोकांनी लंपास केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास घडली.

 • फेरमतदानात टक्केवारी वाढली लोकमत - गुरु, २४ एप्रिल २०१४

  रिसोड (वाशिम): अकोला लोकसभा व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरीता आज रिसोड येथील बाबासाहेब धाबेकर महाविद्यालयातील मतदान केंद्रावर घेण्यात आलेल्या फेरमतदान प्रक्रियेत १६२८ पैकी ८७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. फेरमतदानाची टक्केवारी १0 एप्रिलरोजी झालेल्या मतदानापेक्षा आज सव्वा सहा टक्क्याने वाढत ५३.६८ वर पोहोचली.

 • खेळांची जागा घेतली व्हिडिओ गेमने लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४

  बुलडाणा: बदलत्या युगाचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवत आहे. पूर्वी विशेषत: उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये खेळल्या जाणार्‍या या खेळावरही व्हिडिओ गेम आणि टीव्हीने ताबा मिळविला आहे.

 • सखी सम्राज्ञीची प्राथमिक फेरी लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४
  सखी सम्राज्ञीची प्राथमिक फेरी

  बुलडाणा: अनेक विषयांवर आधारीत सखी सम्राज्ञी स्पर्धा लोकमत सखी मंच आपल्यासाठी आयोजित करत आहे. यात शरीरबांधा अथवा स्त्री सौंदर्याची परिणामे बघितली जाणार नसून बौध्दिक, आत्मविश्‍वास, प्रसंगावधान, सामाजिक जाणीव, सांसारीक, नीटनेटकेपणा इ. गुणांवर सखी सम्राज्ञी स्पर्धा २५ वर्षापुढील महिलांसाठी आयोजित केली आहे.

 • विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची भटकंती लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४

  शेगाव: शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा संपल्या असुन आपल्या वर्गतुकड्या कायम राहण्यासाठी खासगी शाळांनी विद्यार्थी मिळण्यासाठी शथीर्चे प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.

 • गारपिटीमुळे कांदा सडला लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४

  ढोरपगाव : यावर्षी कांदा ऐन बहारात असताना फेब्रुवारी शेवटचा ते मार्च पहिला आठवडा गारपीट पावसाने थैमान घातले. यामुळे परिसरातील कांदा पीक बुडाले. तर गारीपिटीच्या तडाख्याने शेतातील वाफ्यातच कांद्याला सड लागली आहे.

 • अपहरणाचे नाट्य अन् पोलिसांची सतर्कता लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४

  सिंदखेडराजा : शिंदी गावातून एका मुलाचे अपहरण झाल्याची माहिती समोर येताच आज २२ एप्रिल रोजी एकच खळबळ उडाली. साखरखेर्डा पोलीसांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावत बुलडाणा, अकोला, जालना, वाशिम या चार जिल्ह्यात माहिती दिली मात्र अपहरण झालेला मुलगा हा ओळखीच्याच अँटो चालकासोबत असल्याचे समोर आल्याने सर्वांनीच सुटकेच निस्वास सोडला.

आणखी ताज्या बातम्या »