मासिक भविष्य

मेष

मेष

ऩवीन वर्षातील हा महिना आपणांस अनुकूल फलदायी ठरेल. लग्नस्थानी केतू, तृतीयस्थानात गुरु , षष्ठात मंगळ, सप्तमस्थानी शनि-राहू, तर भाग्यस्थानी शुक्र व कर्मस्थानी रवि, लाभस्थानात बुधाचे भ्रमण होत आहे. आपल्या उत्कर्षास पूरक ग्रहमान आहे. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. आपल्या वाक्चातुर्य़ाने दुसर्‍यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. हातात अधिकार येतील. नोकरीत अनुकूल संधी चालून येतील. कल्पनाशक्तीला वाव देणार्‍या घटना घडतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. व्यावसायिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविले जातील. नव्या आशा पल्लवीत होतील. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. कर्तुत्वशक्ती वाढेल्याने धाडसी कामे कराल. उत्तरार्धात विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. लेखक, साहित्यिक, कवी, कलाकार यांना प्रसिद्धी लाभेल. सन्मान होतील. आपल्या श्रमाचे चीज होईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल. एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल.

वृषभ

वृषभ

महिन्याच्या सुरुवातीलाच राशीच्या पंचमातून षष्ठस्थानात मंगळ प्रवेश करीत आहे. विरोधकांच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने तोंड द्याल. हाती घेतलेल्या कामात आपणांस यश लाभेल. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना चांगल्या संधी लाभतील. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराल. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. वैवाहिकदृष्टीने विचार करता मात्र प्रतिकूल ग्रहमान आहे. मंगळ-राहूच्या षष्ठस्थानात होणार्‍या युतिमुळे नेत्रविकार, उष्णतेच्या विकारांचा त्रास होऊ शकतो. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. अंधश्रद्धेला बळी पडू नका. व्यवसाय-उद्योगात भरभराट होईल. आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. व्यवसाय-उद्योगातील आत्मविश्‍वास व कामाचा वेग वाढेल. व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल. जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणारे, इमारत बांधकाम व्यवसायात असणार्‍यांना चांगल्या संधी येतील. विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात घेतील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल.अनावश्यक प्रवास टाळणे हिताचे आहे. महिलांनी कुवतीबाहेरील कामे टाळावी. शेजार्‍याचा त्रास वाटेल. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल.प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू, महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळावेत. रेंगाळलेली कामे विनासायास मार्गी लागीतल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळेल.

मिथून

मिथून

४ फेब्रुवारीला आपल्या राशीच्या पंचमस्थानी तुळेत मंगळाचा प्रवेश होत आहे. पंचमातील मंगळ-राहूमुळे संततीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. संतती मनाविरुद्ध वागण्याची शक्यता राहते. अष्टमातील रवि-बुध-शुक्रावर मंगळाची दृष्टी असल्याने अपघात, उष्णतेचे विकार होण्याची शक्यता राहते. यंत्र-शस्त्रापासून धोका संभवतो. मानसिक ताणतणाव जाणविण्याची शक्यता राहते. पूर्वनियोजित प्रवासात काही कारणाने विलंब होण्याची शक्यता आहे. अवाजवी साहस टाळावे. अनपेक्षित धनलाभ होतील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात कराल. कामानिमित्तच्या घडणार्‍या प्रवासात अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. खोट्या गोष्टी कळल्यामुळे रागाचा पारा उंचावेल. मात्र अविचाराने कोणतेही निर्णय घेऊ नका. जवळच्या नातलगांच्या अनारोग्यामुळे धावपळ होऊन प्रवास करावा लागेल, खर्चाचे प्रमाण वाढेल. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. वाजवी ध्येय प्राप्त करु शकाल. समोर आलेल्या संधीचा फायदा घ्या. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना मनाजोगे काम मिळेल.

कर्क

कर्क

सुखस्थानातील शनि-राहूवरुन मंगळाचे भ्रमण सुरु होत आहे. त्यामुळे घरात वादंग उद्भवण्याची शक्यता राहते. कुटुंबातील वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून आज लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. सध्या थोडा तणावाचा काळ आहे पण म्हणून करीयरकडे दुर्लक्ष करु नका. नव्या उमेदीने कामाला लागाल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून यश लाभेल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील.महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. १३ तारखेला रवि कुंभ राशीत तर बुध वक्री होऊन मकर राशीत प्रवेश करीत आहे. दोन्ही राशीपालट आपणांस कष्टदायक राहतील. अंध:श्रद्धेला बळी पडू नका. प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळावे. जोडीदाराशी सुसंवाद साधावा. आपल्या जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. व्यावहारिक स्पर्धेत आपण आग्रेसर राहणार आहात. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. व्यवसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. वास्तु विषयक कामांना सुरुवात होईल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल.

सिंह

सिंह

आपल्या राशीच्या पराक्रमस्थानात जाणार्‍या मंगळामुळे घरापासून दूर जाण्याचे योग येतील. कामानिमित्त प्रवास घडून येतील. नवीन कल्पना सूचतील. आपल्या इच्छा, अपेक्षा स्वत:च्या काबूत ठेवाव्यात. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात कराल. नोकरीत वरिष्ठांकडून आपल्यावर कामाची जबाबदारी सोपविली जाईल. धाडसी निर्णय घेतले जातील. ज्या बातमीची अगदी अतुरतेने वाट पाहात होतात ती समजल्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण येईल. सप्तमातील रवि-बुध मंगळदृष्ट असल्याने अनुकूल फलदायी ठरतील. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल.आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या वृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. आपले ध्येय साध्य करता येईल. व्यवसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. हौसे मौजेखातर खर्च कराल. खोट्या गोष्टी कळल्यामुळे रागाचा पारा उंचावेल. मात्र अविचाराने कोणतेही निर्णय घेऊ नका. दिनांक १८ रोजी बुध कुंभराशीतून मकर राशीत षष्टस्थानी येत आहे. नोकरी-व्यवसायात उत्कर्ष साधता येईल. पदोन्नती होईल. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. आकर्षक भेटवस्तू मिळतील. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. नवीन परिचय होतील.

कन्या

कन्या

धनस्थानातील शनि-राहूवरुन होणारे मंगळाचे भ्रमण आपल्या खर्चात वाढ करणारे राहील. कुटुंबात तसेच भावंडांत काही कारणांवरुन वाद उदभवण्याची शक्यता राहते. दुसर्‍याच्या मनाचा विचार करुनच वक्तव्य करावे. अनावश्यक खर्च उद्भवण्याची शक्यता राहते.सरकारी नोकरीत कार्यरत असणार्‍या व्यक्तींना सरकारी वाहन-वास्तूचे योग येतील. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश लाभेल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. आपल्या सहकार्‍यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. मित्रपरिवाराबरोबर करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. नवीन कल्पना आकार घेतील. घरातील सुख़सुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यावसायिक प्रदर्शनातून फायदा होईल. नशिबाची साथ लाभेल. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्‍या घटना घडतील. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. नवपरिणितांना गोड बातमीची चाहूल लागेल.नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. नोकरीत बढती-बदलीचे योग येतील. प्रकृतीच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करु नका. संततीस जपा. कोणत्याही मोहाला बळी पडू न आपले नुकसान करुन घेऊ नका. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. धार्मिक शुभसमारंभात सतत सहभाग घ्यायला मिळेल. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. हातून पुण्यकर्म घडेल.

तूळ

तूळ

महिन्याच्या सुरुवातीला आपल्या राशीत येणारा मंगळ त्रासदायक राहील. राशीतील मंगळ- शनि-राहूमुळे आपल्या रागाचा पारा वर चढण्याची शक्यता आहे. आपल्या इच्छा, आकांक्षा काबूत ठेवाव्यात. प्रलोभनांना बळी पडू नये. आपल्या वाक्चातुर्य़ाने दुसर्‍यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून आपली कामे मार्गी लावावी लागतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. अनपेक्षित धनलाभ होतील. गुंतवणूकीतून लाभ होतील. समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकूण घेवूनच त्यावर आपले मत व्यक्त करा. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील.मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. हितशत्रूंच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जावे लागेल. मातुल घराण्यासंबंधी जिव्हाळा वाटेल. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. धार्मिक शुभसमारंभात सतत सहभाग घ्यायला मिळेल. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. हातून पुण्यकर्म घडेल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील.यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत.

वृश्चिक

वृश्चिक

व्ययस्थानातील शनि-राहूवर राशीस्वामी मंगळाचा ४ फेब्रुवारी रोजी प्रवेश होत आहे, तेव्हा आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. उष्णतेचे विकार, नेत्रविकार यांचा त्रास उद्भवू शकतो. स्थावर मालमत्तेचे अथवा वाहनासंबंधीचे व्यवहार जपून करावेत. यंत्र-शस्त्रापासून धोका संभवतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. नोकरीत अधिकारप्राप्ती होईल. वाहनसौख्य लाभेल. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. सतत पाहुण्यांची वर्दळ राहील. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल. आध्यात्मिक क्षेत्रात चांगली प्रगती होईल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. अपेक्षित पत्रव्यवहार अथवा फोन होतील. नोकरीत बढतीचे योग येतील. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. कामाचे पूर्वनियोजन महत्त्वाचे राहील. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. प्रतिष्ठीत बड्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल.प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल.

धनू

धनू

लाभातील मंगळ-शनि-राहू आपणांस प्रतिकूल फलदायी ठरतील. कुसंगतिपासून दूर राहा. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सुसंधी लाभतील. महत्वाची कामे मार्गी लागतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. उत्तरार्धात लाभेश शुक्र धनस्थानात प्रवेश करीत आहे. तेव्हा चांगले अर्थार्जन होईल. राह्त्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. प्रवास सुखकर होईल. भरपूर काम करायचे आणि गृहसौख्याचा आस्वाद घ्यावयाचा असे मनोमन ठरवाल. गृहउद्योगातून हाती पैसा येईल. महत्वाचे निर्णय शांत विचारपूर्वक घरातील मोठ्या व्यक्तिच्या सल्याने घेणे आवश्यक आहे. काही बाबतीत आपल्याला चांगला दिलासा मिळणार आहे. आपले अंदाज अचूक ठरतील. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांतून चांगले यश लाभेल. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. एकमताने निर्णय घ्याल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. आपला आत्मविश्‍वास व मनोबल उंचावेल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकारावी लागेल. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात करता येईल. शेवटी विजय आपलाच होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना नवी दिशा मिळेल. नव्या उमेदीने कामाला लागाल. साचेबद्ध जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. अचानक सहलीचे आयोजन केले जाईल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. नवीन परिचयातून लाभ होतील.

मकर

मकर

महिन्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून रवि-बुधाचे भ्रमण होत आहे. भावंडांशी सुसंवाद साधाल. परदेशस्थ भावंडांचा एखादा सल्ला लाखमोलाचा ठरेल. व्यवसाय-उद्योगासाठी नवीन कर्ज मंजूर होईल. सरकारी परवाने मिळतील. वकील, शिक्षक धर्मोपदेशक यांना समाजात चांगला मान मिळेल. सुखस्थानातील गुरुवरून रविचे होणारे भ्रमण धार्मिक क्षेत्रात प्रगती करणारे राहील. चांगला मार्गदर्शक मिळेल. पंचमातील शुक्रामुळे चांगल्या घटना घडतील. आपण ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहात होता ती समजल्यामुळे आनंदाला पारावर उरणार नाही. घरात मंगलकार्याची नांदी होईल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. महिलांना बदलाची नितांत आवश्यकता वाटेल. त्यामुळे सहलीचे आयोजन कराल. सामाजिक कार्यात असणार्‍या कार्यकर्त्यांना मान-सन्मान प्राप्त होईल. कवि, कलाकार, गायक, वादक यांना सुसंधी लाभतील. नवोदित कलाकारांना चांगले यश लाभेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. तरुणांच्या कर्तृत्वाला झळाळी येईल. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटवाल. विद्यार्थ्यांंना स्पर्धापरिक्षांतून चांगले यश लाभेल. विवाहेच्छुक तरुणांचे विवाह ठरतील. नवपरिणितांना गोड बातमीची चाहूल लागेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. अष्टमातील मंगळ आपल्या वक्तव्यामुळे गैरसमज निर्माण करणारा राहील. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. उष्णतेचे विकार, पित्तविकार यांचा त्रास उद्भविण्याची शक्यता राहते.

कुंभ

कुंभ

राशीच्याभाग्यस्थानातील मंगळ-राहूमिुळे दूरचे प्रवास शक्यतो टाळावेत. कुटुंबातील वयस्कर वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. तसेच भावंडांसाठी देखील हे ग्रहमान प्रतिकूल आहे. विरोधकांच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने तोंड द्यावे लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक अथवा योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच घ्यावेत. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. उंचीवस्त्रालंकारांची खरेदी कराल. नवपरिणितांना गोड बातमीची चाहूल लागेल. संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ होतील. मित्रपरिवाराबरोबर सुग्रास भोजनाचे योग येतील. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल.न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. अनपेक्षित धनप्राप्तीचे योग येतील. सासूरवाडीकडून आर्थिक लाभ घडून येतील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. उष्णतेचे विकार, संसर्गजन्य विकार यांपासून त्रास होण्याची शक्यता राहाते. विरोधकांचा त्रास जाणवेल.

मीन

मीन

महिन्याच्या सुरुवातीला मंगळाचा अष्टमस्थानात प्रवेश होत आहे. आरोग्यासंबंधी तक्ररी उद्भवतील. यंत्र-शस्त्रापासून धोका संभवतो प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळा. आपल्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मनाचा उत्साह कमी पडण्याची शक्यता आहे. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून आज लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. लांबच्या प्रवासाला जाण्यापूर्वीच काही अडथळे येतील. घरातील दुर्लक्षित कामांकडे वेळीच लक्ष द्या. आपल्या जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू, महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळावेत. अनोळखी व्यक्तीवर विश्‍वास ठेवू नका. वयस्कर व्यक्तींच्या गरजांसाठी पैसा खर्च केला जाईल. व्यापार-व्यवसायात नफा होईल. मात्र तात्पुरत्या स्वरुपात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. चांगल्या व्यक्तींची भेट होईल. उत्तरार्धात स्थावरातून लाभ होतील. कवी, कलाकारांना अनुकूल काळ आहे. शुभसमारंभात सहभागी व्हाल. जिभेवर साखर व डोक्यावर बर्फ ठेवून आपली कामे सहजतेने मार्गी लागतील.सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. महत्वाचे निर्णयात योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन लाभेल. नोकरीत बदल करु इच्छिणार्‍या तरुणांना यशोमार्ग लाभेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांनी मात्र सतर्कतेने निर्णय़ घेणो गरजेचे आहे.