साप्ताहिक भविष्य

मेष

मेष

आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. धार्मिक शुभसमारंभात सतत सहभाग घ्यायला मिळेल. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. हातून पुण्यकर्म घडेल. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ होतील, नवनवीन कल्पना आकार घेतील. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या अनिश्‍चितता जाणवेल. आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. व्यवसाय-उद्योगातील आत्मविश्‍वास व कामाचा वेग वाढेल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. गुंतवणूकीतून लाभ होतील. कल्पनाशक्तीला वाव देणार्‍या घटना घडतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. कर्तुत्वशक्ती वाढल्याने धाडसी कामे कराल. नोकरीत अधिकार व सत्ता वाढेल. शुभदिनांक २३, २४.

वृषभ

वृषभ

अष्टमस्थ चंद्राचे भ्रमण मन सैरभैर करणारे राहील. मानसिक ताणतणाव जाणविण्याची शक्यता आहे. अंध:श्रद्धेला बळी पडू नका. प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळावे. व्यावसायिक वादंग टाळावेत. व्यवसाय-उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना यश मिळेल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. मनाजोग्या ठिकाणी बदली होईल. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. शुभदिनांक २५, २६.

मिथून

मिथून

आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. भागीदाराचे सहाकार्य चांगले राहील. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. परंतू आपल्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मनाचा उत्साह कमी पडण्याची शक्यता आहे. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणताही निर्णय घेवू नये. कारण नंतर काही वैचित्र्य कळण्याची शक्यता आहे. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. उत्तरार्धात नवीन व्यावसायिक करार घडतील. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. शुभदिनांक २0, २१.

कर्क

कर्क

आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे.कामाच्या जबाबदार्‍या वाढतील. स्पर्धात्मक कार्यात आपण आघाडीवर राहणार आहात. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांनी मात्र सतर्कतेने निर्णय़ घेणो गरजेचे आहे. नवीन व्यावसायिक करार घडतील. मानसिक ताणतणाव जाणविण्याची शक्यता राहते. पूर्वनियोजित प्रवासात काही कारणाने विलंब होण्याची शक्यता आहे. महिलांची विवाहकार्यातील मध्यस्थी योग्य व निर्णायक ठरणार आहे. जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. कामानिमित्त परदेशप्रवास घडून येण्याची शक्यता राहते. संतसज्जनांचा सहवास लाभेल. शुभदिनांक २३.

सिंह

सिंह

पंचमस्थ चंद्राचे भ्रमण संततीच्या उत्कर्षाची वार्ता देणारे राहील. व्यावसायिक भाग्य बीजे पेरली जातील. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल. विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात घेतील. व्यावसायिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविले जातील. नव्या आशा पल्लवीत होतील. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. आपल्या जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. आपल्या वाक्चातुर्य़ाने दुसर्‍यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. शुभदिनांक २५.

कन्या

कन्या

आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज रहावे लागेल. स्थावर मालमत्ता व्यवहारातून आर्थिक लाभ होतील.संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना यश मिळेल. जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. आपल्या इच्छा, अपेक्षा स्वत:च्या काबूत ठेवाव्यात. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात कराल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. विश्‍वासाच्या जोरावर ध्येय गाठाल. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. शुभदिनांक २0, २१.

तूळ

तूळ

आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. भावंडांशी सुसंवाद साधाल. जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत येतील. एखाद्या सेवाभावी संस्थेतून किंवा सहकारी संस्थातून काम करता येईल. महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक अथवा योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच घ्यावेत. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. वकर्तृत्वाच्या बळावर मोठी मजल माराल. ध्यानधारणेत प्रगती होईल. पुढे घडणार्‍या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. महिलांनी जपजाप्याकडे जास्त लक्ष द्यावे. आपल्या सहकार्‍यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. शुभदिनांक २२, २३.

वृश्चिक

वृश्चिक

धनस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण जूनी येणी वसूल करणारे राहील. आर्थिक बाबतीत चिंतेचे कारण ऩसले तरी आज खर्चावर नियंत्रण हवेच. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. समाजात आपल्या मतांचा आदर होईल. घरातील सुख़सुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड केली जाईल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. नव्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी होईल. व्यवसायातील आत्मविश्‍वास व कामाचा वेग वाढेल. जोडधंद्यातून भरपूर काम मिळेल. नवीन करार होतील. नव्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी होईल. शुभदिनांक २४, २५

धनू

धनू

आपल्याच राशीतून होणारे चंद्राचे भ्रमणामुळे आपल्या वाक्चातुर्य़ाने दुसर्‍यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणे शक्य होईल. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल. घरातील वातावरण आनंदी राहील. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक वस्तूंची खरेदी कराल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. परप्रांताशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करता येतील. शेजार्‍यांचे सहकार्य लाभेल. कामाचा ताण जाणवणार नाही. अचनाक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील. प्रिय व्यचिं्या भेटी होतील. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. नवी दिशा सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. शुभदिनांक २0, २१.

मकर

मकर

आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राह्त्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील.महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील.महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेल. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. नवनवीन कल्पना आकार घेतील. व्यवसाय उद्योगात नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्‍या घटना घडतील. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. नेत्रविकार, उष्णतेचे विकार यांच्यापासून त्रास होण्याची शक्यता आहे. .विरोधकांच्या कारवायांवर मात कराल. शुभदिनांक २२.

कुंभ

कुंभ

आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. मित्रपरिवाराचे सहकार्यामुळे आपल्या रेंगाळलेल्या कामांना गती येईल. आपल्या इच्छा कृतीत येतील. समाजात व कुटुंबात आपल्या मतांचा योग्य आदर केला जाईल. प्रगतिपथावरील आपली घोडदौड यशदायी ठरेल. आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग करुन चांगले अर्थाजन करता येईल. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. नोकरीत मनासा.रख्या घटना घडतील. उत्साह वाढेल. कामानिमित्त दुरचे प्रवास घडून येतील. उत्तरार्धात आपल्या व्यक्तीमत्वाचा चांगला ठसा उमटवाल. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. वैयक्तीक उत्कर्ष साधता येईल. नवनवीन कल्पना आकार घेतील. शुभदिनांक २४, २५.

मीन

मीन

आपल्या राशीच्या दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरी-व्यवसायाच्यादृष्टीने भरभराट करणारे ग्रहमान राहील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल. सतत नाविण्याची आणि जनसमुदायात राहण्याची आवड असल्याने समाजात लोकप्रियता वाढेल. नव्या उमेदीने कामाचा ध्यास घ्याल. कामानिमित्त परदेश प्रवास घडून येतील. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. नोकरीत वरिष्ठांकडून आपल्यावर कामाची जबाबदारी सोपविली जाईल. धाडसी निर्णय घेतले जातील. खेळाडू, प्रकाशक, संपादक यांच्या भरभराटीच्यादृष्टीने हा आठवडा लाभदायक राहील. शुभदिनांक २६.