औरंगाबाद

स्टेट बँकेच्या ‘एटीएम’मधून १६ लाख रुपयांची चोरी

औरंगाबाद : भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमचे डिजिटल लॉक उघडून चोरट्यांनी १६ लाख १७ हजार …

माहेश्‍वरी मंडळाचा अन्नकूट कार्यक्रम

ज्योतीनगर प्रभागातील माहेश्‍वरी मंडळाने कार्तिक महिन्याच्या निमित्ताने अन्नकूट कार्यक्रम साजरा केला. १२ नोव्हें…

केटीएमतर्फे शानदार स्टंटचे प्रदर्शन

औरंगाबाद : युरोपियन रेसिंग दिग्गज केटीएमने आज औरंगाबादमध्ये प्रथमच शानदार ‘केटीएम स्टंट’ सादर केला.…

ताज्या बातम्या

 • कोणता झेंडा घेऊ हाती? लोकमत - ७ तास पूर्वी
  कोणता झेंडा घेऊ हाती?

  लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यावरून ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा पेच कलाकारांमध्ये पडलेला असतानाच काही कलाकारांनी मात्र एकमेकांविरुद्ध बाह्या सरसावल्या आहेत.

 • नांदेड: मुंबईच्या आर्थर रोड जेलचे अधीक्षक दिगंबर वासुदेव बुरकुले यांना लाच घेताना मुंबई येथे रंगेहात पकडण्यात आले असून झडतीत त्यांची नांदेडातही लाखो रुपयांची मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे.

 • गंगाखेड : परभणी लोकसभा मतदार संघात निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना १७ एप्रिल रोजी मतदानापासून वंचित रहावे लागले. मतदान करता न आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये मात्र कुजबूज दिसून आली.

 • नांदेड : श्री १00८ काशी जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पीठारोहणाला २५ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त ८ जुलै ते ११ नोव्हेंबर दरम्यान, चातुर्मासामध्ये जंगमवाडी मठ काशी येथे रजत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 • हंडाभर पाण्यासाठी पायपीट लोकमत - ७ तास पूर्वी

  गडगा (जि.हिंगोली) : ग्रामपंचायतचा नियोजनशून्य कारभार, स्थानिक प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षापणामुळे आतापर्यंत पाणीपुरवठा योजनावर जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मिळूनही पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना तरसण्याची पाळी आली असून गावचा सार्वजनिक पाणीपुरवठा १४ एप्रिलपासून केवळ विद्युत मोटार नादुरूस्त झाल्याने बंद झाला आहे.

 • नांदेड : जादूटोणाविरोधी कायद्याचा धर्माचरणावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण आत्मोन्नतीसाठी करण्यात येणारा पूजापाठ त्यातून वगळण्यात आला आहे, असे प्रतिपादन काशी पीठाचे जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

 • जालन्यात गस्ती पथकावर हल्ला लोकमत - ७ तास पूर्वी

  जालना : विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आरोपी कान्या उर्फ विकी नारायण जाधव याच्यासह अन्य दोघांनी पोलिसांच्या गस्ती पथकावर तुफान दगडफेक करून हल्ला चढविला. हा प्रकार शुक्रवारी रात्री ३ वाजेच्या सुमारास संभाजीनगर भोकरदन नाका येथे घडला.

 • औरंगाबाद : पुण्यात मतदार यादीतील घोळामुळे गोंधळ उडालेला असतानाच आज औरंगाबादेतही काही नागरिकांनी पुरवणी यादीवर आक्षेप घेतला. अर्ज करूनही यादीत नावाचा समावेश न झाल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन आपली तक्रार मांडली.

 • औरंगाबाद : मराठवाड्याला सलग दुसर्‍या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले. हिंगोली, बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत बर्‍याच ठिकाणी वादळीवार्‍यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. हिंगोली जिल्ह्यात वीज कोसळून एक जण ठार झाला.

 • औरंगाबाद : कोणाचे नेहमी डोके दुखते, तर कोणाला पोटाचा त्रास असह्य होतो. काही जण चरबी वाढल्याने चिंतेत तर काही जण पोटर्‍या दुखण्याने त्रस्त आहेत. मणक्याचा त्रास सुरू झाल्याच्या तक्रारीही अनेकांनी केल्या.. ‘निरोगी होऊया, निरोगी राहूया आणि आनंदाने जगूया’ ही ठणठणीत आरोग्यासाठीची ‘संजीवनी’ त्यांना प्राप्त झाली आणि सर्वांचे चेहरे खुलले. दिवसभराच्या धावपळीतून वेळ काढून ‘लोकमत संजीवनी’ प्रदर्शनास भेट दिल्याचा लाभ झाला, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

 • महिला खासदाराची प्रतीक्षा लोकमत - ७ तास पूर्वी

  अशोक कारके , औरंगाबादआरक्षणामुळे महिला सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष व महापौर झाल्या; परंतु स्वातंत्र्यानंतर झालेल्या १५ लोकसभा निवडणुकांमध्ये एकही महिला खासदार औरंगाबादेतून लोकसभेत पोहोचली नाही. यंदाही प्रमुख पक्षांनी महिलांना उमेदवारीपासून दूर ठेवल्यामुळे हा प्रश्नच निकाली निघाला आहे.

 • मांगीरबाबा यात्रा सुरू लोकमत - ७ तास पूर्वी

  औरंगाबाद : शेंद्रा कमंगर येथील मांगीरबाबा यात्रा उत्सवाची सुरुवात आज आरतीने करण्यात आली. दुपारी अचानक झालेल्या वादळी वार्‍यासह पावसाने भाविकांची मोठी तारांबळ उडाली.

 • औरंगाबाद : घाटी रुग्णालयाने सहा महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या वॉशिंग मशिन्सचे १६ पैकी ८ सेट बंद पडले. ही खरेदी करताना गुणवत्तेशी तडजोड करण्यात आल्याच्या लोकमतमधील वृत्तामुळे अस्वस्थ झालेल्या प्रशासनाने खरेदी तर संचालक स्तरावर झाली, अशी सावध भूमिका घेतली आहे. आम्ही केवळ या मशिनरीचे डेमोस्ट्रेशन बघितले, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे.

 • औरंगाबाद : अखेरच्या घटकेला कोणत्याही पद्धतीने मतदान बदलासाठी मतदारांना आमिष दाखविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे २१, २२ आणि २३ या अखेरच्या तीन दिवस अलर्ट राहा. नाकाबंदी करा. कार्यकर्त्यांवर अधिक करडी नजर ठेवा व कुणाचाही मुलाहिजा न बाळगता त्यांच्यावर कारवाई करा, या शब्दांत शनिवारी सायंकाळी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी पोलिसांना आदेश दिले.

आणखी ताज्या बातम्या »