शोधा

व्यापार

गुंतवणुकीसाठी भारत सुरक्षित

गुंतवणुकीसाठी भारत हा सर्वाधिक सुरक्षित देश असल्याचा विश्‍वास पी. चिंदबरम यांनी व्यक्त केला. ते दुसर्‍या आशियाई अनिवासी संमेलनात बोलत होते. या संमेलनामध्ये १ हजारपेक्षा अधिक प्रतिनिधींची उपस्थिती होती.

सोन्या-चांदीला लग्नसराईची झळाळी

लग्नसराईदरम्यान मागणी वाढल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सोन्यामध्ये होत असलेल्या घसरणीला आ…

सेन्सेक्स ४0६ अंकांनी आपटला!

अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून सुरू असलेले प्रोत्साहन पॅकेज बंद केले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने आज शेअर…

डिझेल होणार नियंत्रणमुक्त

सरकारकडून डिझेलच्या किमती नियंत्रणमुक्त करण्यात येतील, असे प्रतिपादन पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली केपीए…

ताज्या बातम्या

 • जागतिक बाजारात कमजोर स्थिती असतानाही मंगळवारी लग्नसराईच्या मागणीने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात तेजी नोंदली.

 • भारताच्या विकासात अनिवासी भारतीयांची महत्त्वपूर्ण भूमिका रेखांकित करताना ब्रिटनस्थित प्रमुख उद्योगपती लॉर्ड पॉल म्हणाले की, मागील सहा महिन्यांत एनआरआयकडून देशात सुमारे ६५ अब्ज डॉलर आले आहेत.

 • बीटी कापसासोबतच शेतकर्‍यांचा कल देशी कापूस वाणाकडे वाढला असून, याच पृष्ठभूमीवर देशातील विविध राज्यातील कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या देशी कापसाच्या वाणावर देशात शासकीय पातळीवर चाचणी घेतली जात आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एकेएच-0८१ कापसाच्या वाणासह परभणी, सूरज या वाणाचा यामध्ये समावेश आहे. बीटी कापसाला पर्याय म्हणून या कृषी विद्यापीठाने 0८१ हे वाण विकसित केले आहे.

 • ऐतिहासिक उच्चांकावरून सेन्सेक्स मागे परतला

  मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये गुंतवणूकदारांकडून माहिती तंत्रज्ञान, धातू आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठय़ा प्रमाणात नफेखोरी झाली.

 • आता एटीएममधून मिळणार पीएफ लोकमत - २० तास पूर्वी

  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या सुमारे ५ कोटी सभासदांना बँकेप्रमाणेच सुविधा देण्याचा विचार करीत असून, यामुळे संबंधितांना एटीएममधून आपली ठेव हवी असेल तेव्हा काढून घेणे शक्य होणार आहे.

 • उत्पादन घटल्याने चहा कडाडला लोकमत - मंगळ, २२ एप्रिल २०१४

  दिवसेंदिवस चहाची वाढती मागणी आणि पावसामुळे पीक खराब झाल्याने यंदा चहाच्या किमती कडाडल्या आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.

 • लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यास आगामी पाच वर्षांत जीडीपीची सरासरी वाढ ६.५ टक्के राहील, असा अंदाज क्रिसिल या संस्थेने वर्तविला आहे.

 • सोने-चांदीला नफेखोरीचा फटका लोकमत - मंगळ, २२ एप्रिल २०१४
  सोने-चांदीला नफेखोरीचा फटका

  जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर स्टॉकिस्टकडून मोठय़ा प्रमाणात झालेल्या विक्रीमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव २१0 रुपयांनी घसरून ३0,0४0 रुपये प्रतितोळा राहिला. दु

 • सेन्सेक्स पुन्हा उच्चांकावर लोकमत - मंगळ, २२ एप्रिल २०१४
  सेन्सेक्स पुन्हा उच्चांकावर

  मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी १३७ अंकांनी वधारून २२,७६५ अंकांवर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजसहित प्रमुख कंपन्यांच्या नफ्यात भरीव वाढ झाल्याने बाजारात भांडवलाचा ओघ वाढला.

 • सावकार बँकांच्या पुढे.. लोकमत - मंगळ, २२ एप्रिल २०१४

  जिल्ह्यात कर्जासाठी बॅँकांएवढेच किंबहुना त्याहूनही अधिक प्रस्थ सावकारांनी जमविल्याचे चित्र आहे. हे सावकार शासकीय परवानाधारक आहेत.

 • अवकाळी पाऊस, गारपिटीने यंदा दीड महिना उशिराने नवीन करडी तेल बाजारात दाखल झाले असून, भावही उतरणीला लागले आहे. मात्र, आवक घटल्याने खोबरेल तेलाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. दिलासाची बाब म्हणजे, मागील आठवडाभर गहू, ज्वारी, तांदूळ, डाळींचे भाव स्थिर होते.

 • नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलविणारा प्रकल्प म्हणून मिहानकडे पाहिले जात आहे. विदर्भाच्या विकासाचा अग्रदूत म्हणून नागपूरच्या महत्त्वाकांक्षी मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट (मिहान) मुळे विदर्भात आशेचा एक नवा किरण दिसू लागला आहे. येत्या पाच वर्षात या प्रकल्पात २0 अब्ज डॉलरची परदेशी गुंतवणूक अपेक्षित आहे.

 • देशाच्या परकीय गंगाजळीमध्ये सलग दुसर्‍या महिन्यात वाढ नोंदली गेली असून, ११ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये परकीय चलनाचा साठा २ अब्ज ७९ कोटी अमेरिकी डॉलरने वाढला आहे.

 • सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ लोकमत - सोम, २१ एप्रिल २०१४
  सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ

  सेन्सेक्सवरील सात कंपन्यांच्या संयुक्त बाजार भांडवलात गेल्या आठवड्यात ३0,८६२ कोटी रुपयांची वाढ झाली. या काळात टीसीएस आणि आयटीसी या कंपन्यांच्या भांडवलात सर्वाधिक वाढ नोंदली गेली.

आणखी ताज्या बातम्या »