गोवा

ताज्या बातम्या

 • जीवनावश्यक अशा विविध साधनांची निर्मिती खाण उद्योगातून होत असते. या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास सर्वसामान्यांना त्याचा अधिक लाभ मिळतो, हे लक्षात येईल. पर्यावरणाचे संतुलन राखूनच हा व्यवसाय केला जातो, असे प्रतिपादन भारतीय खाण अभियंता संघटनेचे अध्यक्ष अरजेथ बागच्ची यांनी केले.

 • शिवोली येथील श्री राष्ट्रोळी देवाचा तिसरा वर्धापनदिन गुरुवार दि. २४ रोजी होईल. यानिमित्त सकाळी ११ वा. धार्मिक विधी, श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ पासून महाप्रसादाला सुरुवात होईल.

 • जुने गोवे येथील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रातर्फे दि. २२ रोजी 'काजू उत्पादन व प्रक्रिया तंत्रज्ञान' या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिर दि. २४ पर्यंत चालणार आहे.

 • थोर गोमंतकीय गायक भावगंधर्व दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कला अकादमीतर्फे दीनानाथांच्या अजरामर नाट्यपदांचा अंतर्भाव असलेला नाट्यसंगीतपर कार्यक्रम गुरुवार, दि. २४ रोजी सायं. ६.३0 वा. दीनानाथ मंगेशकर कलामंदिर, पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून काही आसन व्यवस्था राखीव असेल.

 • कुडचडे-काकोडा पालिकेने कुडचडे परिसरातील गटारांच्या साफसफाईचे काम हाती घेतले असून पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ती कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी दिली.

 • हणजूण-कायसूव पंचायतीच्या खिडकीच्या तावदानावर अज्ञाताने विटेचा तुकडा मारून काच फोडल्याची घटना घडली.

 • गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत वावरणारे विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते सध्या निवांत असून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दिसणारा कार्यकर्त्यांचा उत्साह थंडावल्याचे दिसत आहे. निवडणुकीचा निकाल येण्यास अजून महिनाभराचा कालावधी असल्यामुळे कार्यकर्त्यांची झिंग उतरली असली तरी आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी होण्याचा विश्‍वास काही कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत.

 • पेडणेतील उद्यान आगीच्या भक्ष्यस्थानी लोकमत - मंगळ, २२ एप्रिल २०१४

  पेडणे शहराच्या मध्यभागी असलेल्या उद्यानाला आग लागल्याने उद्यानात असलेल्या वीजवाहिन्या पूर्णत: जळून खाक झाल्या. दुपारच्या वेळेला लागलेली आग काही मिनिटांतच भडकली.

 • आत्मरक्षणासाठी प्रत्येकाने कराटे प्रशिक्षण घेणे गरजेचे असून हायस्कूल तसेच शालेय विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन उद्योजक राजेंद्र कारेकर यांनी केले.

 • अस्नोड्यात वाहतूक कोंडी नित्याचीच लोकमत - मंगळ, २२ एप्रिल २०१४

  अस्नोडा पूल ते कदंब बसस्थानकादरम्यान वाहनांची नेहमीच कोंडी होत असल्यामुळे वाहनचालकांना तसेच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. हा रस्ता अरुंद असून दोन्ही बाजूला पारंपरिक दुकाने व घरे असल्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

 • संकल्प थिएटर आणि रवींद्र भवन, कुडचडे आयोजित 'रंगमाची' हे बालनाट्य शिबिर यावर्षी नामवंत नाट्य दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार दीपक आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते १४ मे या कालावधीत कुडचडे येथे घेण्यात येणार आहे.

 • मडगाव : मडगाव नगरपालिकेने आपल्या सर्व वीसही प्रभागांतील विविध कामांसाठी सात महिन्यांपूर्वी जारी के लेल्या ई-निविदा कामांबाबत खुद्द नगरपालिकाच गंभीर नाही, असे आढळून आल्याने आता या कामासाठी ई-निविदा सादर केलेल्या अनेक निविदाकारांनी माघार घेतली असल्याने ही प्रक्रियाच संकटात येण्याचे संकेत मिळत आहेत.

 • उद्घाटन झाले; लोकार्पण कधी? लोकमत - सोम, २१ एप्रिल २०१४

  दशरथ मांद्रेकर ल्ल वाळपईमोठा गाजावाजा करून वाळपईतील चार प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, त्यापैकी एकाही प्रकल्पाचे लोकार्पण झाले नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचे वातावरण आह़े इस्पितळ, भाजी मार्केट, पालिका मार्केट व बसस्थानक हे चार प्रकल्प लोकार्पण करण्याची मागणी होत आह़े

 • फोंडा : देशातील अनेक शहरांना, रस्त्यांना तसेच ठिकाणांना परकीयांची नावे आहेत. o्रीनगरमधील दल सरोवराजवळील o्री शंकराचार्य टेकडीचे प्राचीन नाव पुरातत्व सर्वेक्षण विभागाने बदलून ते तख्त-ए-सुलेमान केले. हिंदूंची ओळख पूर्णपणे पुसून टाकण्याचे हे षड्यंत्र असून याविरुद्ध सर्व हिंदूंनी एकत्र यावे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी फोंडय़ात केले.

आणखी ताज्या बातम्या »